हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत ! – शिवाजीराव मोहिते, संपादक, ‘सी’ न्यूज

‘सी’ न्यूजचे संपादक शिवाजीराव मोहिते (डावीकडे) यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देतांना शिरीष सारडा (उजवीकडे)

सांगली – हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी देण्यात आमचाही वाटा आहे, याचा आम्हाला आनंदच आहे, असे मत ‘सी’ न्यूजचे संपादक श्री. शिवाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले. श्री. शिवाजीराव मोहिते यांची १ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे, सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर आणि श्री. शिरीष सारडा यांनी सदिच्छा भेट घेतली. ‘सी’ न्यूज ही वाहिनी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांच्या कार्यास वेळोवेळी करत असलेल्या सहकार्याविषयी श्री. मोहिते यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देण्यात आली. त्या वेळी हे मनोगत व्यक्त केले.

श्री. मोहिते यांनी जिज्ञासेने श्रीकृष्णाच्या चित्राविषयी माहिती जाणून घेऊन ‘प्रतिदिन काहीकाळ तरी नामजप करीन’, असे सांगितले.

Leave a Comment