फरिदाबाद (हरियाणा) येथे ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’त सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

केंद्रीय मंत्री श्री. कृष्ण पाल गुर्जर यांना प्रदर्शनाची माहिती देतांना सनातन संस्थेच्या साधिका सौ. तृप्ती जोशी

फरिदाबाद (हरियाणा) – ‘गीता जयंती’निमित्त २२ आणि २३ डिसेंबर या दिवशी फरिदाबादमध्ये ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव’ साजरा करण्यात आला. हा महोत्सव येथील एच्.एस्.व्ही.पी. कन्व्हेंशन सेंटर, सेक्टर १२ येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवामध्ये इस्कॉन, प्रजापिता ब्रह्मकुमारी, जियो गीता आदी संस्था सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवामध्ये सनातन संस्थेच्या वतीने सनातनचे आध्यात्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला केंद्रीय मंत्री श्री. कृष्ण पाल गुर्जर, हरियाणाचे परिवहन मंत्री श्री. मूलचंद शर्मा, तिलपतचे भाजप आमदार श्री. राजेश नागर आणि बडखलमधील भाजपच्या आमदार सीमा त्रिखा यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

तिलपतचे भाजप आमदार श्री. राजेश नागर यांना प्रदर्शनाची माहिती देतांना सनातन संस्थेच्या साधिका सौ. तृप्ती जोशी

क्षणचित्रे

१. आमदार श्री. राजेश नागर यांनी सनातननििर्मत भगवान श्रीकृष्णाचे चित्र आणि अन्य सात्त्विक उत्पादने खरेदी केली.

२. एका विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी प्रवचन घेण्यासाठी सनातन संस्थेला निमंत्रित केले आहे.

प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू

Leave a Comment