मांसाहाराचे विविध दुष्परिणाम

मांसाहारातील तमोगुणी लहरींच्या प्रभावाने देहातील सत्त्वगुणांचा र्‍हास होतो. मांसाहारामुळे होणारे इतर दुष्परिणाम येथे पाहू.

 

१. पशूवधगृहातील (कत्तलखान्यातील) प्रत्याघातांनी वेदनांच्या तुटक लहरी तेथील दगडांमध्ये उत्पन्न करणे

दिल्ली विद्यापिठाचे शास्त्रज्ञ प्राध्यापक मदनमोहन बज आणि विजयराज सिंह यांनी रशियन पशूवधगृहात (कत्तलखान्यात) जाऊन तेथील जिवांच्या पिंडांच्या वेदनांचा अभ्यास केला. ते त्यांच्या प्रबंधात सांगतात, ‘पशूवधगृहातील प्रत्याघातांनी वेदनांच्या तुटक लहरी तेथील दगडांमध्ये (इंटरॅक्शन ऑफ अबेटायर जनरेटेड नॉन-लिनियर इलास्टिक पँनवेव्हज् इन रॉक्स्) उत्पन्न केल्या.’

 

२. मांसाहारातील तमोगुणी लहरींच्या प्रभावाने देहातील सत्त्वगुणांचा र्‍हास होणे आणि या विचारांच्या प्रभावाने मनुष्याच्या हातून एखादे दुष्कृत्य होणे

‘मांसाहार करणे, ही कृतीच तमप्रधान मानली आहे. ‘दुसर्‍या जिवाच्या हत्येतून निर्माण झालेले खाद्य देहातील सर्व गुणांचा र्‍हास करते’, असा धर्मनियम आहे. अशा मांसाहारातील तमोगुणी लहरींच्या प्रभावाने देहातील सत्त्वगुणांचा र्‍हास होतो, परिणामी चांगल्या विचारांचा र्‍हास होऊन अविचाराने युक्त अशा हिंसक विचारांचा उदय होऊ शकतो. या अविचारांच्या प्रभावाने मनुष्य एखादे दुष्कृत्य करण्यासही सिद्ध होतो; म्हणून तमोगुणाने युक्त असा मांसाहार टाळावा.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ कृष्ण द्वादशी ४.३.२००८, सायं. ७.४५)

 

३. अनुभूती

३ अ. मांसाहार केल्यावर विविध शारीरिक आणि मानसिक त्रास
होणे अन् त्या दिवसापासून मांसाहार वर्ज्य करण्याचा ठाम निश्चय होणे

‘११.१२.२००५ या दिवशी एका साधकाच्या घरी रात्री मांसाहारी जेवण करून मी आश्रमात परत आलो. केवळ १५ मिनिटांत मला होत असलेल्या त्रासात वाढ झाली असल्याचे माझ्या लक्षात आले. त्या वेळी माझ्या बुद्धीवर काळे आवरण आले होते. ‘मी काय करत आहे आणि काय बोलत आहे’, याचे मला भान नव्हते. मला काहीच सुचत नव्हते. त्या स्थितीत जे शब्द मी कधीच बोललो नाही, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. ‘हा आध्यात्मिक त्रास आहे’, हे एका संतांच्या कृपेमुळे माझ्या लक्षात आले. वाईट शक्ती माझ्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यानंतर प.पू. डॉक्टर आणि दत्तगुरु यांना प्रार्थना करून मी नामजप चालू केला. त्यानंतरही माझा त्रास घटला नाही. मला रात्रभर झोप लागली नाही. माझी अतिशय तगमग झाली. माझे शरीर जड झाले, पोटात आग पडल्यासारखी झाली. रात्री थंडी असतांनाही मी पंखा चालू केला. तशाच अवस्थेत मी अधूनमधून प्रार्थना आणि नामजप चालू ठेवला.

दुसर्‍या दिवशी सकाळीही मला त्रास होतच होता. ‘सेवा चालू ठेवावी. सेवेमुळेच त्रास घटेल’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर सेवा करतांना माझ्या डोळ्यांवर पुष्कळ झोप येऊ लागली. सेवा केल्यावर मला होत असलेला त्रास थोडा घटला. त्यानंतर रात्री सत्संग घेण्यासाठी गेल्यावर मी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘आता माझ्यात शक्ती आणि उत्साहही नाही. तेव्हा तुमची कृपा असू द्या.’ सत्संग चालू झाल्यानंतर मला थोडा उत्साह वाटू लागला आणि हलकेपणा जाणवला. त्या दिवसापासून मांसाहार वर्ज्य करण्याचा माझ्या मनाचा ठाम निश्चय झाला.’

– श्री. संतोष आनंदा गरुड, नेसाई, गोवा.

 

४. मांसाहार केल्यामुळे जिवातील तमोगुण वाढून त्याच्या
आध्यात्मिक उन्नतीत विघ्न उत्पन्न होणे आणि जीव संसारचक्रात अडकणे

‘प्राण्यांच्या शरिरात तमोगुण जास्त प्रमाणात असतो. मांसाहार केल्यामुळे त्या जिवातील तमोगुण आपल्या शरिरात येऊन आपल्याला जडत्व प्राप्त होते. त्यामुळे आध्यात्मिक उन्नती होण्यात विघ्न उत्पन्न होते. त्यामुळे जीव संसारचक्रात अडकतो.’ – श्रीकृष्ण (श्री. जितेंद्र राठी यांच्या माध्यमातून, सप्टेंबर २००१, रात्री ८ ते ११)

 

५. पितृपक्षात आणि श्राद्धाच्या वेळी जिवाने मांसाहारासारखी तामसिक कृती केल्यास तिचे फळ त्याच्यासह त्याच्या पितरांनाही मिळणे आणि पितृऋण घटण्यापेक्षा आणखी वाढणे

प्रश्न : पितृपक्षात मांसाहार का करत नाही ?

उत्तर : ‘मांसाहार केलेल्या जिवातील तम लहरींमुळे काही अतृप्त पितर त्या जिवाच्या माध्यमातून त्यांच्या वासना पूर्ण करतात. तसेच जिवाच्या सूक्ष्म-शरिरात काळ्या शक्तीची स्थाने निर्माण करून जिवाचा लिंगदेह पूर्णपणे दूषित करतात. पितर जिवाशी साधर्म्य दाखवतात. पितृपक्षात पृथ्वीच्या जवळील २०० मीटर परिसर पितरांच्या लिंगदेहांनी आच्छादलेला असतो. या काळात जिवाद्वारे केले जाणारे श्राद्धकर्म किंवा अशास्त्रीय कर्म यांनुसार पितरांना गती मिळते. जिवाने मांसाहारासारखी तामसिक कृती केल्यास त्याचे फळ त्याच्यासह त्याच्या पितरांनाही मिळते. त्यामुळे पितृऋण न घटता आणखी वाढते. कलियुगात पितृपक्षाच्या काळात आधुनिकतेच्या नावाखाली तामसिक कृती पसरत आहेत. त्यामुळे समष्टी दुःखही दुपटीने वाढत आहे. याच कारणास्तव पितृपक्षात मांसाहार, अपेयपान, शूचिर्भूत न होता स्वयंपाक करणे इत्यादी तामसिक आणि राजसिक कर्मे वर्ज्य आहेत.’ – (सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर पूर्वाश्रमीच्या कु. क्षिप्रा वेद़ यांच्या माध्यमातून, ३०.९.२००७, रात्री ८.१३

 

५ अ. खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

मांसाच्या तुकड्याचे सूक्ष्म-चित्र
मांसाच्या तुकड्याचे सूक्ष्म-चित्र

१. सूक्ष्म-चित्रातील त्रासदायक स्पंदने : ४ टक्के

२. ‘सूक्ष्म-चित्रातील स्पंदनांचे प्रमाण : वाईट शक्ती ३ टक्के, वाईट शक्ती (मारक) ३ टक्के, मायावी ३ टक्के, आकर्षण शक्ती २ टक्के

३. इतर सूत्रे

अ. मेलेल्या प्राण्याच्या मांसात सात्त्विकता नसून त्याकडे वाईट शक्ती आकृष्ट होत असतात.

आ. मांसातून प्रक्षेपित होणार्‍या मायावी स्पंदनांचा मांस खाणार्‍या व्यक्तीच्या मनावर परिणाम होतो आणि तिला मांसाच्या चवीविषयी आवड निर्माण होऊन ते खावेसे वाटते.

इ. मांस खाल्ल्याने शरीर धष्टपुष्ट होते, असा समज आहे; पण खरेतर मांस खाल्ल्याचा परिणाम व्यक्तीच्या पचनक्रियेवर होतो, तसेच तिचे शरीर, मन आणि देहाभोवतीचे कोश यांवर काळ्या शक्तीचे आवरण निर्माण होते.

ई. मांस खाल्ल्याने व्यक्तीला प्राणीहत्येचे पापही लागू शकते.’

– सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (आश्विन शु. ६, कलियुग वर्ष ५१११ (२४.९.२००९)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सात्त्विक आहाराचे महत्त्व’

Leave a Comment