देवतेला अन्नाचा नैवेद्य दाखवण्यामागील शास्त्र

Article also available in :

आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

आपल्या संस्कृतीमध्ये देवाला नैवेद्य दाखवून तो नैवेद्यच प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. पूर्वी भोजन करण्यापूर्वी देवाला अन्नाचा नैवेद्य दाखवल्याखेरीज अन्न ग्रहण केले जात नव्हते; पण हल्ली ही कृती सण आणि धार्मिक उत्सवांच्या वेळेपुरतीच मर्यादित राहिली आहे. हल्लीच्या काळात नैवेद्यच नव्हे, तर पूजा करण्याचेही प्रमाण घटले आहे. नैवेद्य आणि प्रसाद हे शब्द तर मंदिरांमध्येच ऐकू येतात. अशी आजची परिस्थिती झाली आहे. देवतेला नैवेद्य दाखवून  आणि नैवेद्य न दाखवता अन्न ग्रहण करणे याविषयीचा एक प्रयोग महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयात करण्यात आला. त्याविषयीची माहिती पुढे दिली आहे.

‘या लेखावरून देवाला नैवेद्य दाखवून किंवा अर्पण करून
कोणतीही गोष्ट ग्रहण करणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल.’– (परात्पर गुरु डॉ.) आठवले

 

१. नैवेद्याचे महत्त्व

‘नैवेद्य हा षोडशोपचार पूजेतील एक उपचार आहे. यामध्ये देवतेचे पूजन झाल्यानंतर आरती करण्याआधी देवतेला नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवतांना सात्त्विक अन्नाचा नैवेद्य भावपूर्णपणे प्रार्थना करून देवतेला अर्पण केल्यास त्या नैवेद्यातील पदार्थांच्या सात्त्विकतेमुळे देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्य-लहरी नैवेद्यात आकृष्ट होतात. त्यामुळे नैवेद्यासाठी अन्न शिजवतांना त्यात तुपासारख्या सात्त्विक पदार्थांचा वापर केला जातो. देवतेला नैवेद्य दाखवल्यामुळे त्यात आकृष्ट झालेल्या चैतन्याने त्या नैवेद्याच्या आजूबाजूचे वायूमंडल शुद्ध होते. वायूमंडल शुद्ध झाल्याने अशा अन्नावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याचे प्रमाण अल्प होते.

 

२. नैवेद्य ग्रहण करण्याचे लाभ

अ. भावपूर्ण पूजा आणि प्रार्थना करून देवतेला अन्नाचा नैवेद्य दाखवल्यास, त्याद्वारे त्या देवतेचे तत्त्व आणि चैतन्य त्या अन्नात अधिक प्रमाणात आकृष्ट होते. त्याचा लाभ प्रसाद ग्रहण करणार्‍यास होतो.

आ. देवाला अन्नाचा नैवेद्य दाखवल्याने देवतेच्या चैतन्यामुळे अन्नावर आलेले नकारात्मक आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते.

इ. त्या नैवेद्यात आकृष्ट झालेल्या चैतन्यामुळे तो प्रसादस्वरूपात ग्रहण करणार्‍या व्यक्तीवरील आवरण न्यून होते.

 

३. देवतेला दाखवलेला नैवेद्य प्रसादरूपात ग्रहण करणे
आणि नैवद्य न दाखवता ग्रहण करणे, याचा प्रयोग करतांना आलेल्या अनुभूती

– श्री. ऋत्विज नितीन ढवण, (‘हॉटेल मॅनेजमेंट’ शिकलेला विद्यार्थी), महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (१.११.२०२०)

 

देवाला ‘नैवेद्य’ दाखवलेले आणि न दाखवलेले अन्न ग्रहण करणे

‘१.११.२०२० या दिवशी शिरा करण्यात आला. त्याचे दोन भाग करण्यात आले. एका भागाचा देवाला ‘नैवेद्य’ दाखवण्यात आला. त्यानंतर ‘तो शिरा ग्रहण केल्यावर काय स्पंदने जाणवतात ?’, हे बघण्यात आले. शिर्‍याच्या दुसर्‍या भागाचा देवाला ‘नैवेद्य’ दाखवला नाही. ‘तो (देवाला ‘नैवेद्य’ न दाखवलेला) शिरा ग्रहण केल्यावर काय स्पंदने जाणवतात ?’, हेही बघण्यात आले. यांविषयी मला पुढीलप्रमाणे जाणवले.

१. देवाला ‘नैवेद्य’ दाखवलेला शिरा ग्रहण करणे

अ. देवाला ‘नैवेद्य’ दाखवलेल्या शिर्‍याकडे पाहून मला पुष्कळ हलके वाटले, तसेच थंडावा जाणवला.

आ. त्या प्रसादाच्या शिर्‍याचा पहिला घास खाल्ल्यावर लगेच माझे अनाहतचक्र आणि त्यावरील चक्रे यांना चैतन्य मिळाल्याची जाणीव मला झाली. ‘त्या चक्रांवर प्रकाश पसरला’, असे मला वाटले.

इ. त्यानंतर प्रसादाच्या शिर्‍याची स्पंदने अनाहतचक्राच्या खालच्या खालच्या चक्रांवर जाणवून शेवटी ती मूलाधारचक्रावर जाणवली. माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

ई. माझी कुंडलिनीशक्ती जागृत होऊन ती मणिपूरचक्रापर्यंत पोचली. त्यानंतर माझी सूर्यनाडी कार्यरत झाली.

उ. प्रसादाचा शिरा खाल्ल्याने मनाला शांती आणि तृप्ती लाभली.

२. देवाला ‘नैवेद्य’ न दाखवलेला शिरा ग्रहण करणे

अ. देवाला ‘नैवेद्य’ न दाखवलेल्या शिर्‍याकडे पाहून मला तोंडवळ्यावर दाब जाणवला.

आ. मी त्या शिर्‍याचा पहिला घास खाल्ला, तेव्हाही मला दाब जाणवला. तो घास मला पटकन गिळता येत नव्हता.

इ. घास गिळल्यावरही ‘तो पोटात गेला आहे’, याची मला जाणीव झाली नाही.

ई. मला शिरा खाल्ल्याचे समाधान लाभले नाही.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२.११.२०२०)

Leave a Comment