हिंदूंची राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भातील दुःस्थिती आणि उपाय

१. स्वधर्माविषयी अज्ञान !

१ अ. बहुतेक हिंदूंना धर्म या विषयावर पाच मिनिटेही बोलता येत नाही.

१ आ. बहुतेक हिंदूंना धर्म म्हणजे काय ?, हे माहित नसल्यामुळे त्यांची स्थिती पुढीलप्रमाणे झाली आहे.

१. धर्माभिमान नसणे

२. धर्माचरण करत नसल्याने ईश्‍वराचा आशीर्वाद नसणे

१ इ. उपाय : धर्मविषयक अज्ञान दूर करण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे.

 

२. धर्मशिक्षणाचा अभाव

आज भारतात धर्मशिक्षणाची स्थितीही विदारक आहे.

२ अ. ब्राह्मणद्वेषामुळे परंपरागत धर्मशिक्षण संपुष्टात आले आहे.

२ आ. निधर्मी व्यवस्था आणि सर्वधर्मसमभावाचा अतिरेकी प्रचार यांमुळे शाळामधून हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास बंदी आहे.

२ इ. उपाय : मुसलमानांना गेली १४०० वर्षे कडवे धर्मशिक्षण मिळत आहे. हिंदूंनाही धर्मसंस्कार निर्माण होण्यासाठी काही पिढ्या शिक्षण द्यावे लागेल.

 

३. धर्माधिष्ठित राजकीय दृष्टीचा अभाव !

३ अ. एकही राजकीय पक्ष हिंदुत्ववादी नाही. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकत नाही.

३ आ. राममंदिरच नाही, तर त्याबरोबर भारतात सुराज्य येण्यासाठी रामराज्य स्थापन करणे महत्त्वाचे आहे, हे भाजपादी राजकीय पक्षांना कळत नाही.

३ इ. उपाय : हिंदु राष्ट्राचा प्रसार करून हिंदूंमध्ये राजकीय दृष्टी निर्माण करणे आणि हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदूंचे संघटन करणे

 

४. हिंदूंमध्ये धर्मजागृती करण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा प्रसार करा !

४ अ. धर्मजागृतीचे तात्कालिक कार्य आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा प्रसार यांद्वारे हिंदूंना आकर्षित करण्याची क्षमता !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात महत्त्व (टक्के) हिंदूंना आकर्षित करण्याची क्षमता (टक्के)
तात्कालिक ध्येये १० ३०
अंतीम ध्येय – हिंदु राष्ट्राची स्थापना ९० ७०
एकूण १०० १००

४ आ. जाहीर धर्मसभा आणि साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग : जाहीर धर्मसभेमुळे होणारी जागृती व्यापक प्रमाणात होत असली, तरी ती बहुधा तात्कालिक स्वरूपाची असते. याउलट साप्ताहिक धर्मशिक्षणवर्गामुळे जागृती होण्यास वेळ लागला, तरी येणारे कायमचे जोडले जातात.

 

५. धर्मकार्य होण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न
करूनही विशेष यश न मिळण्याची कारणे समजून घ्या !

५ अ. काळ पूरक नसणे : साधकांच्या संदर्भात हे सूत्र लागू होते.

५ आ. ईश्‍वराचा आशीर्वाद नसणे : साधना न करणार्‍यांच्या संदर्भात हे सूत्र लागू होते.

– डॉ. आठवले (३.५.२०१४)

Leave a Comment