
रामनाथी (गोवा) – महाराष्ट्र राज्यातील नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार आणि मूर्तीकार श्री. अशोक सोनकुसरे अन् त्यांच्या पत्नी सौ. लता सोनकुसरे यांनी २५ जून २०२६ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून शिल्पकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि या परीक्षेत महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला आहे. चित्रकूट येथील ‘रामदर्शन’ या प्रकल्पात ते मुख्य शिल्पकार म्हणून सहभागी होते. ते उत्कृष्ट पाषाण कला आणि जीवंत मूर्ती यांसाठी ओळखले जातात. अनेक प्रसिद्ध ठिकाणी त्यांनी शिल्पे बनवली आहेत.
श्री. सोनकुसरे यांनी आश्रमातील कलेशी संबंधित सेवा आणि मूर्तीशाळा यांविषयी माहिती जाणून घेतली. सनातनचे मूर्तीकार साधक श्री. रामानंद परब, श्री. राजू सुतार, तसेच चित्रकार साधिका सौ. जान्हवी रमेश शिंदे यांनी श्री. सोनकुसरे यांची भेट घेऊन संवाद साधला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे कार्य पुष्कळ प्रशंसनीय आहे ! – अशोक सोनकुसरे
सनातनच्या आश्रमात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीचे कार्य पाहून श्री. अशोक सोनकुसरे प्रभावित झाले. याप्रसंगी अभिप्राय व्यक्त करतांना ते म्हणाले, ‘‘गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) कार्य पुष्कळ प्रशंसनीय आहे. येथील सर्वकाही कल्पनेच्या पलीकडचे आहे. आतापर्यंत मी ऐकले होते. आता प्रत्यक्ष पहाता आले. पुष्कळ अप्रतिम आहे. पुष्कळ आनंद झाला.’’
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !
राजभवनाचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !