फरीदाबाद (हरियाणा) येथे जन्माष्टमी निमित्त सनातन संस्था आयोजित ग्रंथ-प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

फरीदाबाद (हरियाणा) : जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबादच्या सेक्टर २८ मधील श्री शिवशक्ती मंदिर आणि ‘एन्.आय.टी.’ – ५ मधील श्री बांके बिहारी मंदिरात ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

क्षणचित्र

‘एन्.आय.टी.’ – ५ मधील श्री बांके बिहारी मंदिराचे महंत ललित गोसाईजी यांनी ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यासाठी आवश्यक ते साहाय्य केले.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्रीकृष्ण पाल गुर्जर यांची ग्रंथ-प्रदर्शनाला भेट

सेक्टर २८ मधील श्री शिवशक्ती मंदिरात आयोजित ग्रंथप्रदर्शनाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री. श्रीकृष्ण पाल गुर्जर यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आलेल्या विविध ग्रंथांची आणि सात्त्विक उत्पादनांची माहिती जिज्ञासूपणे जाणून घेतली. या वेळी त्यांनी ‘सनातन संस्था अशा उपक्रमांद्वारे समाजात आध्यात्मिक आणि धार्मिक जागृती घडवून आणत आहे’, असे सांगून कौतुक केले.