‘लव्ह जिहाद’वरील बेळगाव येथील व्याख्यानासाठी १ सहस्र ६०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती !

बेळगाव – हिंदु धर्माविषयीचा अभिमान नसल्यामुळे आणि आपल्या संस्कृतीची महानता माहीत नसल्यामुळे हिंदु मुली लव्ह जिहादमध्ये फसत आहेत. ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु मुलींवर नाही, तर धर्मावर घातलेला घाला आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. त्या २८ जून या दिवशी श्री जगतज्योती बसवेश्वर कल्याण मंडप, दानम्मा देवस्थान, महात्मा फुले रोड, शहापूर, बेळगाव येथे ‘लव्ह जिहाद’वर आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होत्या.

या प्रसंगी ‘इस्कॉन’ संप्रदायाचे मुख्य श्रीमान शंकरारण्य प्रभूजी, सनातन संस्थेचे संत पू. शंकर गुंजेकर यांच्यासह १ सहस्र ६०० हून अधिक हिंदु नागरिक, महिला, युवती या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. विविध शाळांमधून विद्यार्थी मोठ्या संख्येने व्याख्यानासाठी उपस्थित होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या वेळी हिंदु युवतींनी ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या अभियानाचे सक्रीय सदस्य होऊन स्वतःचे आणि राष्ट्राचे रक्षण करावे, असे आवाहन श्री. रमेश शिंदे यांनी केले.
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला
हिंदु म्हणून संघटित होऊनच आपण खर्या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल करू शकतो ! – सौ. शुभा...