मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना रणजित सावरकर आणि अभय वर्तक यांच्या भेटी !

Article also available in :

मुंबई – ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी २४ सप्टेंबर या दिवशी भांडुप येथील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली. या वेळी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून धर्मकार्यासाठी संघटित होण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘शिवशंभो मित्रमंडळा’च्या कार्यकर्त्यांसमवेत श्री. रणजित सावरकर

भांडुप ओंकार मित्रमंडळ, शिवशंभो मित्रमंडळ, समर्थनगरमधील मराठा मित्रमंडळ आदी मंडळांना श्री. रणजित सावरकर आणि श्री. अभय वर्तक यांनी भेट दिली. या वेळी सर्वांसमवेत त्यांनी श्री गणेशाची आरतीही केली.

गणेशोत्सवातून क्षात्रतेज जागृत करा ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

ओंकार मित्रमंडळा’मध्ये आरती करतांना अनुक्रमे श्री. अभय वर्तक आणि श्री. रणजित सावरकर

दैत्यांचा नाश करणारा श्री गणेश ही आपली देवता आहे, तर हिंदूंवर आक्रमण करण्याचे धारिष्ट्य कुणी करू नये, असे स्वत:चे सामर्थ्य निर्माण करा. गणपतीला स्वत:चे रक्षण करायला सांगतांना स्वत:चे रक्षण करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठीही प्रार्थना करा.

शास्त्र समजून घेऊन श्री गणेशाची आराधना करा ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

सत्ययुगामध्ये श्री गणेशाचे वाहन सिंह, त्रेतायुगामध्ये मयुर, तर द्वापर आणि कलियुग यांमध्ये श्री गणेशाचे वाहन मूषक आहे. युगानुसार श्री गणेशाने वाहन पालटले असले, तरी प्रत्येक युगात पाश आणि अंकुश ही शस्त्रे मात्र कायम आहेत. त्यामुळे शास्त्र समजून घेऊन श्री गणेशाची आराधना करा.