रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

१. आश्रमातील सकारात्मक स्पंदने वाढल्याचे जाणवणे : ‘यापूर्वी मी आश्रमात आलो असतांना मला इमारतीच्या प्रवेशद्वारापासून सकारात्मक स्पंदने जाणवली होती; मात्र या वेळी मला आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच सकारात्मक स्पंदने जाणवली. ती सकारात्मक स्पंदने माझ्या छातीतून शरिरात प्रवेश करत असल्यामुळे हृदयाच्या ठिकाणी मला संवेदना जाणवत होत्या. माझी अनुभूती मी शब्दांत मांडू शकत नाही.’

– अधिवक्ता खुश खंडेलवाल (संस्थापक, हिंदु टास्क फोर्स), ठाणे, महाराष्ट्र.

२. ‘आश्रम पहाणे’, हे माझ्यासाठी पुष्कळ लाभदायक ठरले. येथील माहिती सर्व हिंदूंसाठी अत्यंत आवश्यक आहे.

– पूजा व्ही., धारवाड, कर्नाटक.

३. ‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. येथे प्रत्येक पावलाला सूक्ष्म स्पंदनांचा अनुभव घेता येतो.’

– श्री. विशाल जाधव, धारवाड, कर्नाटक.

४. ‘आश्रमात मन आणि आत्मा यांना पुष्कळ शांती मिळते. येथील सर्व गोष्टी चांगल्या असून त्या प्रेरणादायी आहेत.’

– श्री. ललित कुमार (राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु जन शक्ती), तेलंगाणा, आंध्रप्रदेश.

५. ‘आश्रमात आल्यानंतर मला अनुभवायला मिळाले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेमुळे जे दैवी कार्य चालले आहे, ते काही सर्वसाधारण कार्य नाही.’ येथे आल्यानंतर माझ्या रोमारोमांत दैवी शांती देणारे दिव्य चैतन्य ओतप्रोत भरले गेले.’

– श्री. राम ज्ञानीदास महात्यागी (संस्थापक, महात्यागी सेवा संस्थान, श्री तिरखेडी आश्रम), गोंदिया, महाराष्ट्र. (१५.६.२०२२)

६. ‘हा आश्रम म्हणजे भारतीय सनातन संस्कृतीचे साक्षात् प्रतिबिंब आहे.’

– श्री. परमात्माजी महाराज (श्री परमात्मा महासंस्थानम्), धारवाड, कर्नाटक. (१५.६.२०२२)

७. ‘आश्रम पाहून मला अतिशय आनंद झाला. ‘माझ्या मनातील अनेक संदेह दूर कसे झाले ?’, हे मला कळलेच नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे दैवी व्यक्तीमत्त्व आहे’, हे मी अनुभवले.’

– श्री. प्रकाश आत्माराम देशमुख (कार्यकर्ता, स्वा. सावरकर युवा विचार मंच), पुणे (१५.६.२०२२)

८. ‘हा आश्रम म्हणजे धरतीवरील स्वर्ग आहे. येथे आल्यावर सकारात्मक ऊर्जा मिळते.’

– प.पू. चंद्रकांत महाराज शुक्ल (जिल्हा प्रमुख, गुरुवंदना मंच), बलसाड, गुजरात. (१६.६.२०२२)

९. ‘आश्रमातील स्वच्छता, नियोजन, वेळेचे पालन’, हे सर्व पाहून माझे मन प्रसन्न झाले. या आश्रमातून बाहेर पडावेसे वाटत नाही.’

– श्री. ज्ञानेश्वर उत्तम दांडेकर (तालुका अध्यक्ष, धर्मयोद्धा संघ), संभाजीनगर (१६.६.२०२२)

१०. ‘अध्यात्म हे सगळ्या जिवांसाठी आवश्यक असते; पण सध्या जग विज्ञानमय झाल्यामुळे अध्यात्माचे महत्त्व विज्ञानाच्या माध्यमातून सिद्ध करावे लागते. त्या दृष्टीने आपला प्रयोग अतिशय चांगला आहे.’

– श्री. अभय केसरकर, बोरी, गोवा. (१६.६.२०२२)

११. ‘तुम्ही करत असलेले संशोधनकार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.’

– श्री. देवेंद्र कुमार, फोंडा, गोवा. (१७.६.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment