श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)

श्रावणी सोमवार

श्रावण महिन्यातील दर सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन त्याची पूजा करावी आणि शक्य असल्यास निराहार उपवास करावा किंवा नक्त व्रत करावे. यामुळे शंकर प्रसन्न होऊन शिवसायुज्य मुक्ती मिळते.

श्रावण सोमवारी उपवास करून शिवाची विधीवत् पूजा करणे

‘उपोषितः शुचिर्भूत्वा सोमवारे जितेन्द्रियः।

वैदिकैर्लौकिकैर्मन्त्रैर्विधिवत्पूजयेच्छिवम् ॥’ – ग्रंथ व्रत राज

अर्थ : संयम आणि शुचिर्भूतपणा आदी नियमांचे पालन करत सोमवारी उपवास करून वैदिक अथवा लौकिक मंत्राने शिवाची विधीवत् पूजा करावी.

शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.

 शिवाची पूजा कशी करावी ?

अ. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी.

आ. जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी.

इ. शिवाच्या चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी.

ई. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर शिवाचा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो.’

.

शिवामूठ व्रत

विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणार्‍या चार सोमवारी ४ प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. शिवाला शिवामूठ अर्पण करण्याचे महत्त्व आणि हे व्रत करतांना सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया घडते, हे या लेखातून जाणून घेऊया.

 

शिवाला शिवामूठ अर्पण करतांनाचे केलेले सूक्ष्म-परीक्षण

 

व्रत करण्याची पद्धत

महाराष्ट्रात विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या.

 

भावपूर्णपणे शिवामूठ अर्पण करतांना हाताच्या मुद्रेचे केलेले सूक्ष्म-परीक्षण

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

2 thoughts on “श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)”

  1. Can you guide me.. Can this Shiv Mooth pooja can be done any time after marriage like 50 or 60yrs ladies

    And can this be done by even Unmarried girls

    Kindly mail if possible

    Reply
    • Namaskar,

      It is not required for married women to perform this vrat after 5 years of marriage.

      No, unmarried girls cannot do this vrat.

      Reply

Leave a Comment