देहली – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या सामाजिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील न्यू कोंडली फेज-३ मधील शिवशक्ती मंदिराच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात मंदिरातील भक्त, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी सनातनच्या ममता गुप्ता म्हणाल्या, ‘‘एक दिवस मंदिराची स्वच्छता करून न थांबता भगवंताचे मंदिर नेहमीच स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हीच गुरुदेवांच्या चरणी खरी कृतज्ञता ठरेल.’’ या सत्कार्यासाठी स्थानिक धर्मप्रेमी मधु हरबोला आणि सुमन तिवारी यांनी विशेष साहाय्य केले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी या अभियानाचे कौतुक केले.
Home > कार्य > समाजसाहाय्य > देहली येथे भाविक आणि धर्मप्रेमी यांच्याकडून शिवशक्ती मंदिराच्या परिसराची स्वच्छता
देहली येथे भाविक आणि धर्मप्रेमी यांच्याकडून शिवशक्ती मंदिराच्या परिसराची स्वच्छता
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !

