सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम
देहली – ‘विश्व अग्निहोत्र दिन’ आणि ‘होळी’ यांच्या निमित्ताने सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या विद्यमाने एका विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनाचा देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथील अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
या वेळी येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. निधी सेठ यांनी ‘होळी आणि रंगपंचमी यांमागील अध्यात्मशास्त्र’, होळीचे ‘पूजन कसे करावे ?’ आदींविषयी मार्गदर्शन केले. सनातनचे श्री. चंद्र प्रकाश यांनी ‘आपत्काळात अग्निहोत्राचे महत्त्व’ विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. साक्षी चढ्ढा यांनी केले.
क्षणचित्र
या कार्यक्रमातील जिज्ञासू सौ. अर्चना शर्मा यांनी सांगितले की, त्या प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ त्यांच्या दुकानामध्ये अग्निहोत्र करतात. त्यामुळे ग्राहकांनाही त्यांच्या दुकानामध्ये चैतन्याची अनुभूती येते.

धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !