उरण (जिल्हा रायगड) येथे महिलादिनानिमित्त व्याख्यान

उरण (जिल्हा रायगड) – आपल्यासमोर आदर्श राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी चेन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई या वीरांगना आहेत. प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री शक्तीच्या रूपाने कार्यरत असते. पंडिता विदुषी तिलोत्तमा आणि महाकवी कालिदास यांच्या उदाहरणातून स्पष्ट केले. कालिदास यांची विवाहाच्या वेळी फसवणूक झाल्याने तिलोत्तमाने ‘तुम्ही जेव्हा ज्ञानी व्हाल, तेव्हाच माझे खर्या अर्थाने पती असाल’, असे सांगून त्यांच्याकडून अभ्यास करवून घेतला. पुढे ते कवी कालिदास म्हणून राजकवी बनले. घरातली स्त्री ही सुसंस्कारी असेल, तर कुटुंब संस्कारक्षम होते. धर्माचरण हे प्रत्येक स्त्रीने करायला हवे. महिलांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आत्मबल वाढण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे सनातन संस्थेच्या सौ. मोहिनी मांढरे या वेळी म्हणाल्या. येथील श्री गोपाळकृष्ण वाचनालय येथे वाचनालयातील वाचकांसाठी महिला दिनानिमित्त ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन वाचनालयाचे उपाध्यक्ष श्री. अरुण पाठारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वृषाली पाठारे यांनी, तर आभारप्रदर्शन ग्रंथपाल सौ. जिजा घरत यांनी केले. या वेळी अनेक जिज्ञासू उपस्थित होते. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष अधिवक्ता पराग म्हात्रे, माजी अध्यक्षा सौ. वैशाली कोळगावकर, तसेच अन्य कर्मचारी हे उपस्थित होते.
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !