श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अध्यात्मात कुणालाही मोडता येणार नाही, असा उच्चांक गाठणार आहेत ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी शरणागतीने वंदन करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (वर्ष २०१९)

‘ज्याच्याबद्दल सर्वांना घरच्याप्रमाणे आधार वाटतो अन् जो साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेतीलच नाही, तर अन्य अडचणीही सोडवू शकतो, असा कुणी असेल, याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. अशा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ एकमेव आहेत !

१. प्रेमळ आई आणि साधकांच्या सर्वांगीण प्रगतीची तीव्र तळमळ असलेले मार्गदर्शक गुरु या दोघांचे गुण एकत्र असल्याचे अन् व्यापक स्तरावर कार्यरत असलेले माझ्या पहाण्यातील एकमेव उदाहरण म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ! ‘घरादाराचा त्याग केलेल्या साधकांना माझ्यानंतर कोण सांभाळून घेणार ?’ आणि ‘त्यांची प्रगती कोण करून घेणार ?’ या चिंतेतून त्यांनी मला मुक्त केले आहे.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यात ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग या तिन्ही योगांचा अन् व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांचा अपूर्व संगम आहे.

३. आध्यात्मिक प्रगती शक्ती, भाव, चैतन्य, आनंद, शांती अशा स्तरांवर होत जाते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या सर्व स्तरांवर एकाच वेळी आणि नेहमीच असतात.

४. हिंदु राष्ट्रात त्यांच्यासारखे अनेक परिपूर्ण मार्गदर्शक लागतील, हे लक्षात घेऊन त्या इतरांनाही वेगाने सिद्ध करत आहेत.

५. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई अध्यात्मात असा उच्चांक गाठणार आहेत की, तो कुणालाही मोडता येणार नाही !

६. विविध दैवी गुण असल्याने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या माझ्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ असल्याचे सप्तर्षींनी नाडीवाचनात आधीच सांगितले आहे.

अशा सर्वांगांनी परिपूर्ण श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना वाढदिवसानिमित्त अनेक, अनेक, अनेक शुभेच्छा !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२०.९.२०२२)

2 thoughts on “श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अध्यात्मात कुणालाही मोडता येणार नाही, असा उच्चांक गाठणार आहेत ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले”

Leave a Comment