वास्तूशास्त्रानुसार घरात देवघर कसे असावे ?

बृहस्पति हा ईशान्य दिशेचा स्वामी आहे, ज्याला ‘ईशान कोना’सुद्धा म्हटले जाते. ईशान ईश्वर किंवा देव आहे. अशाप्रकारे ही देवाची / गुरूंची दिशा आहे. म्हणून तेथे देवघर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. घराच्या या भागात देवळाचे स्थान जसे आहे, ते संपूर्ण घराची ऊर्जा त्या दिशेने खेचते आणि पुढे घेऊन जाते, घराच्या मध्यभागी ठेवलेले एक मंदिर, ज्याला ब्रह्मस्थान म्हटले जाते. ते शुभकारक आहे आणि यामुळे रहिवाशांना समृद्धी आणि चांगले आरोग्य मिळू शकते.

देवघर बनवतांना ते थेट फरशीवर ठेवू नये. देवघर संगमरवरी किंवा लाकडाचे बनलेले असावे. काचेपासून बनलेली देवघरे टाळा. देवघर कोठे आहे हे यापेक्षा तेथे नियमितची पूजा-अर्चा भावपूर्ण होते ना, हेसुद्धा महत्त्वाचे असते. कुटुंबासाठी एकत्र बसून प्रार्थना करण्यास पुरेशी जागा आहे ना, याची निश्चिती करावी. देवघराच्या क्षेत्रात उर्जेचा चांगला आणि निरोगी प्रवाह असावा. ते नेहमी स्वच्छ ठेवावे. आपल्याला देवघरातून शांतता लाभणे सर्वांत महत्वाचे आहे. सध्या जागेच्या समस्येमुळे महानगरांमध्ये देवघरासाठी स्वतंत्र खोली शक्य नसते. अशा घरांसाठी भिंतीवर चढलेल्या देवघरांचा विचार करू शकता.

 

देवघराविषयी घ्यायची काळजी

१. देवघरात मध्यभागी गणपती, त्याच्या डाव्या हाताला स्त्री आणि उजव्या हाताला पुरुष देवता अशी मांडणी करावी.

२. देवघर सजवण्यासाठी ताजी फुले वापरावीत.

३. चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी सुगंधी उदबत्त्या, धूप लावू शकतो.

४. उदबत्ती, पूजा सामग्री आणि धार्मिक पुस्तके ठेवण्यासाठी देवघराजवळ एक छोटासा खण सिद्ध करावा.

५. देवघराच्या खाली अनावश्यक वस्तू ठेवण्याचे टाळावे. या ठिकाणी केराचा डबा ठेवणे टाळावे.

६. मृत पूर्वजांची छायाचित्रे देवघरात ठेवू नयेत.

संदर्भ – www.housing.com

9 thoughts on “वास्तूशास्त्रानुसार घरात देवघर कसे असावे ?”

   • खूपच उपयोगी माहिती मिळाली आहे पण अजून थोडी जास्त माहिती मिळाली असती तर चांगले झाले असते देवघराविषयी व त्याच्या मांडणी विषयी विस्तार

    Reply
    • नमस्कार राजू जी

     आपल्याला माहिती आवडली हे बघून आनंद झाला. या संकेतस्थळावरील माहिती सनातनच्या ग्रंथ संपदेतून घेतलेली असते. आपल्याला या विषयी किंवा देवपूजा, उपासना, आणि अन्य धार्मिक कृतींमागील शास्त्रीय माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल तर सनातनचे ग्रंथ नक्की वाचा. हे सर्व ग्रंथ पुढील लिंक वर उपलब्ध आहेत.
     https://sanatanshop.com/shop/marathi-books/mr-hindu-dharma-and-sanskar/mr-science-behind-religious-acts/

     आपली
     सनातन संस्था

     Reply
 1. फार चागंलि माहीती मीळती
  कशाप्रकारची माहीती मीळणे काळाची गरज आहे

  Reply
 2. देवाला नैवेद्य दाखवताना कुठला मंत्र म्हणावा

  Reply
  • नमस्कार राणी जी

   आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. देवाला नैवेद्य अर्पण करतांना पुढील मंत्र म्हणू शकतात

   नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे ह्यचलां कुरु ।
   ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ॥
   शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च ।
   आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ॥

   अर्थ : हे भगवंता, या नैवेद्याचा स्वीकार कर आणि तुझ्याप्रती माझी भक्ती वाढव. मला या जन्मी माझे इष्टार्थ प्राप्त होऊन पुढील गतीही चांगली मिळू दे. साखर, दही, दूध आणि तुपापासून तयार केलेला हा नैवेद्य ग्रहण कर आणि मला आशीर्वाद प्रदान कर.

   नैवेद्य अर्पण करण्याचा विधी आपल्या पुरोहितांकडून समजून घ्यावा अशी विनंती.

   आपली,
   सनातन संस्था

   Reply

Leave a Comment