शक्ती

देवतेबद्दल अध्यात्मशास्त्रीय माहिती कळली, तर देवतेबद्दल श्रद्धा वाढायला मदत होते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला मदत होते आणि अशी उपासना अधिक फलदायी असते. यासाठी या ग्रंथात शक्तींची निर्मिती आणि प्रकार, शिव अन् शक्ती यांच्या उपासनेतील फरक इत्यादींविषयी शास्त्रीय माहिती दिली आहे. याचबरोबर श्री लक्ष्मी, श्री दुर्गा यांसारख्या देवींची वैशिष्ट्ये आणि कार्ये, त्यांची विविध रूपे, उपासनापद्धती, त्यांच्याशी संबंधित सण, उत्सव आणि व्रते आदींविषयी अध्यात्मशास्त्रीय माहितीही दिली आहे.

शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्‍यांना वरील अध्यात्मशास्त्रीय माहिती निश्चितच उपयुक्त ठरेल; परंतु सर्वसाधारण व्यक्तीने मात्र यासंदर्भात पुढील नियम लक्षात ठेवावा. रामायण वाचले की श्रीरामाची,


गणपति अथर्वशीर्ष वाचले की श्री गणपतीची उपासना करावी, असे काही जणांना वाटते. त्याच तर्‍हेने या ग्रंथातील माहिती वाचून ‘आपणही श्री लक्ष्मी, श्री दुर्गा वगैरेंसारख्या देवींची उपासना करावी’, असे काही जणांना वाटण्याची शक्यता आहे. परंतु अशा तर्‍हेच्या उपासनेने सगळ्यांचीच आध्यात्मिक उन्नती जलद होत नाही; कारण श्री लक्ष्मी, श्री दुर्गा वगैरे देवींची उपासना करणे त्यांना आवश्यक असले, तरच त्या उपासनेचा जास्त फायदा होतो, नाहीतर खूप साधना करूनही फारच थोडी प्रगती होते. अशा देवींची उपासना करणे आवश्यक आहे कि नाही, हे सर्वसाधारण व्यक्तीला कळत नाही; म्हणून त्याने फक्त माहिती म्हणूनच हा ग्रंथ वाचावा. शक्तीची अनुभूती येण्याच्या दृष्टीने साधनेचा पहिला टप्पा म्हणून आपल्या कुलदेवतेचा नामजप करावा. कुलदेवतेच्या उपासनेविषयी माहिती ग्रंथात दिली आहे.
(श्री लक्ष्मी, श्री दुर्गा वगैरे कुलदेवता असल्यास त्यांची उपासना अवश्य करावी.) पुढे गुरूंनी अन्य एखाद्या देवीचा नामजप करण्यास सांगितल्यास किंवा साधनेच्या पुढच्या टप्प्यात आध्यात्मिक उन्नतीसाठी त्या देवीचा नामजप करणे आवश्यक असल्यास त्या वेळी या ग्रंथातील माहितीचा उपयोग त्या देवीप्रती श्रद्धा वाढण्यासाठी होईल. इतरांना ग्रंथातील माहिती वाचून विविध देवींविषयी काहीतरी नवीन कळले, असे जाणवेल.

हा ग्रंथ वाचून शक्तीपूजकांची देवीवरील श्रद्धा अधिक दृढ होवो आणि प्रत्येकाला साधना करण्याची प्रेरणा मिळो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना.

– संकलक

अर्पणमूल्य : रु. ६०/-

संपर्क क्रमांक : ९३२२३१५३१७

Leave a Comment