पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी साधनेसंदर्भात सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

संकटांमधून बाहेर पडण्यासाठी भगवंताची भक्तीच उपयोगी पडते ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

पुणे – कठीण काळामध्ये भगवंतच आपले रक्षण करतो. तसेच तो आपण केलेल्या साधनेचे योग्य ते फळ देतो. भक्त प्रल्हाद, अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांना त्यांच्या भक्तीचे फळ मिळाले; कारण संकटांमधून बाहेर पडण्यासाठी भगवंताची भक्तीच उपयोगी पडते. येणार्‍या भीषण काळात तरून जाण्यासाठी कठोर साधना करण्यासह स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं निर्मूलन करणे याला पर्याय नाही, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी ३१ जुलै या दिवशी साधनेसंदर्भात ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘येणार्‍या आपत्काळाच्या सिद्धतेसाठी पाटा-वरवंटा, सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे, जाते आदी गोष्टी वापरण्यास शिका’, असे आवाहनही केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment