आपत्काळात व्यष्टी आणि समष्टी साधनाच तारेल ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाड्ये, सनातन संस्था

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील धर्मप्रेमींना ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

(सद्गुरु) कु. स्वाती खाडये

सांगली – सध्याच्या आपत्काळात साधनाच आपल्याला तारू शकते. त्यामुळे व्यष्टीसह समष्टी साधना करणे महत्त्वाचे आहे. व्यष्टी साधनेसाठी कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करायला हवा. समाजाला साधनेकडे वळवणे, ही समष्टी साधना होय. प्रारब्धभोग भोगण्याकरता शक्ती मिळण्यासाठी आपल्याला साधनाच वाढवावी लागेल, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. २८ जुलै या दिवशी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील धर्मप्रेमींसाठी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन आयोजित केले होते. या मार्गदर्शनासाठी ८० धर्मप्रेमी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश कु. प्रतिभा तावरे यांनी उद्देश सांगितला.

 

‘संत घरी येणार’, असा भाव ठेवून मार्गदर्शनाची सिद्धता करणार्‍या धर्मप्रेमी सौ. सविता जाधव !

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद येथील धर्मप्रेमी सौ. सविता जाधव यांनी ‘संत मार्गदर्शनासाठी घरी येणार आहेत’, असा भाव ठेवून घरासमोर रांगोळी काढली. घरातील स्वच्छता करून सर्व साहित्य व्यवस्थित ठेवले होते. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक झाल्याचे सौ. जाधव यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment