साधना हेच जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

‘आनंदी जीवनासाठी साधना’ याविषयावर मार्गदर्शन

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि शेजारी कु. प्रतिभा तावरे

सांगली – पाश्‍चात्त्य जीवनप्रणालीत बहुतांश करून केवळ सुखाचा विचार केलेला आढळतो. याउलट हिंदु धर्मात सुख-दु:खाच्या पलिकडील आनंदप्राप्तीचा विचार केलेला आढळतो. मुनष्यजीवनात येणार्‍या सुख-दु:खावर मात करण्यासाठी साधनाच उपयोगी पडते किंबहुना साधना हेच जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर आहे. तरी प्रत्येकाने कुलदेवतेचा नामजप आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप अशी योग्य साधना केल्यास त्यांनाही आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होईल, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या सनातन संस्थेच्या वतीने विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालय येथे १ मार्च या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ याविषयावर मार्गदर्शन करत होत्या.

या मार्गदर्शनासाठी ४०० जिज्ञासूंची उपस्थित होती. या प्रसंगी कु. प्रतिभा तावरे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या वेळी सनातन संस्थेचे संत पू. सदाशिव आणि पू (सौ.) शैलजा परांजपे यांची वंदनीय उपस्थिती होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment