विदेशी लोकांनी हिंदूंना अधात्म शिकवण्यापूर्वी हिंदूंनी त्याचा अभ्यास करून साधना करावी ! – श्री. अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

नवी देहली – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जगभरामध्ये वैद्यकशास्त्रात मोठे नाव आहे. विज्ञानापेक्षा अध्यात्म हे सर्वश्रेष्ठ असल्याचे लक्षात आल्याने त्याचा प्रसार आणि प्रसार यांसाठी त्यांनी सनातन संस्थेची स्थापना केली आहे. अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व हे विविध वैज्ञानिक उपकरणांच्या कसोटीला तपासून सिद्धही केले आहे. याचा परिणाम म्हणून आज विदेशातून मोठ्या प्रमाणात अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी लोक आकृष्ट होत आहेत. आपण हिंदूंनी वेळीच आपल्या धर्माचा अभ्यास केला नाही, तर उद्या विदेशातील लोकांकडून आपल्याला अध्यात्म समजून घ्यायची वेळ येईल. तसे होऊ नये; म्हणून प्रत्येकाने आजपासूनच आपल्या धर्माचा अभ्यास आणि साधना यांना प्रारंभ केला पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी येथील श्री राधाकृष्ण मंदिरात श्री. सुमित शर्मा यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केले. या वेळी अध्यात्माचे अभ्यासक डॉ. प्रवेश, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अन् गोरक्षक अमितेश चौबे, श्री गोपाळ गोरक्षण दलाच्या अध्यक्षा श्रीमती शांता शर्मा, महंत रामकिशन शर्मा आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते.

श्री. सुमित शर्मा यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले की, मनुस्मृतीचा अभ्यास न करताच तिला विरोध केला जातो. प्रत्यक्षात विविध स्मृतींमध्ये कलियुगासाठी ‘पराशर स्मृति’ श्रेष्ठ सांगितली आहे. मूळ मनुस्मृतीचा अभ्यास केल्यास त्याचे श्रेष्ठत्व सर्वसामान्यांच्या लक्षात येईल. कालौघात कुप्रथा बंद करणे हे हिंदूंनी नेहमीच स्वीकारले आहे; परंतु आजकाल सरसकट हिंदु धर्माला विरोध करणे जे चालू आहे जे चुकीचे आहे. गोमाता राष्ट्रमाता आहे. तिला राष्ट्रीय पशू संबोधणे अपमानास्पद आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment