वर्धा जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी साधनावृद्धी प्रवचने

वर्धा – सनातन संस्थेच्या वतीने वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी साधनावृद्धी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. १२ ते २० फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या प्रवचनांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही जणांनी सेवेत सहभागी होण्याचीही सिद्धता दर्शवली. या वेळी गुरुकृपायोगानुसार साधना आणि आनंदी जीवनासाठी अध्यात्म यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यात सर्वसामान्यांकडून साधनेत होणार्‍या चुका, योग्य साधनेसाठी आवश्यक गुण, विविध योगमार्गांतील कठीणता, देवघराची मांडणी, नामजपाचे महत्त्व, तसेच नामजप कोणता करावा ? इत्यादींविषयी माहिती देण्यात आली.

वर्धा येथील विविध ठिकाणी ही प्रवचने सौ. भक्ती चौधरी, सौ. विजया भोळे, सौ. वंदना कलोडे, सौ. रजनी थोटे, सौ. शिल्पा पाध्ये यांनी घेतली. यासमवेतच चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी सौ. दीपाली सिंगाभट्टी, सौ. मंगला दर्वे आणि सौ. प्रगती मामीडवार यांनी प्रवचने घेतली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment