देहली येथील विश्‍व पुस्तक मेळाव्यातील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्तराखंडचे पर्यटनमंत्री श्री सत्पाल महाराज, खासदार
डॉ. सत्यनारायण जटिया यांच्यासह विविध मान्यवरांच्या भेटी

श्री. सतपाल महाराज यांना सनातन संस्थेच्या कार्याविषयी माहिती देताना सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक

देहली – येथील प्रगती मैदानात चालू असलेल्या विश्‍व पुस्तक मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला उत्तराखंडचे पर्यटनमंत्री श्री सत्पाल महाराज यांनी भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. राज्यसभेचे खासदार डॉ. सत्यनारायण जटिया यांनीही या प्रदर्शनाला भेट देऊन सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य जाणून घेतले. सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ चांगले असल्याचा अभिप्राय त्यांनी या वेळी दिला.

४ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत हा पुस्तक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या अध्यात्म, राष्ट्र-धर्मरक्षण, आचारधर्म, बालसंस्कार अशा विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे, डॉ. सत्यनारायण जटीया आणि सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री
‘यू.ए.एस्.’च्या सहाय्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भातील ग्रंथाची प्रभावळ मोजताना संशोधक

 

प्रदर्शनाला भेट दिलेल्या ‘न्यूरो’ संशोधकांचे उद्गार

सनातन संस्थेच्या ग्रंथांमधून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते !

ग्रंथप्रदर्शनाला काही ‘न्यूरो’ संशोधकांनी भेट दिली. या वेळी त्यांनी ‘यू.ए.एस्.’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने सनातन संस्थेच्या ग्रंथांमधून प्रक्षेपित होणार्‍या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजली. ‘या ग्रंथांमधून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत आहे’, असे उद्गार त्यांनी या वेळी काढले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment