हिंदु धर्मशास्त्रातील रूढी आणि परंपरा अन् त्यांमागील वैज्ञानिक कारणे

पुरो(अधो)गाम्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा ‘SpeakingTree.in’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

‘हिंदु धर्मशास्त्रात अनेक रूढी-परंपरा उद्धृत केल्या आहेत. त्यांमागे धार्मिक आणि आध्यात्मिक कारणांसमवेत वैज्ञानिक कारणेही आहेत; मात्र तथाकथित बुद्धीवाद्यांनी या रूढींना अंधश्रद्धा आणि अंधविश्‍वास संबोधून हेटाळणी केली आहे. सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांत आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विविध अंकांत ही कारणे अन् त्यांमागील वैज्ञानिक दृष्टीकोन दिला आहे; मात्र यांवर संशोधन न करता केवळ सनातन म्हणते; म्हणून तिने दिलेल्या माहितीला अंनिससारख्या संस्थांनी नाके मुरडली. देहलीतील ‘पॅट्रियाटिक फोरम’ या राष्ट्रप्रेमी संस्थेशी निगडित असलेले वैज्ञानिक आणि तज्ञ यांनी संशोधन करून हिंदु धर्मातील रूढींमागील वैज्ञानिक कारणे शोधून काढली आहेत. त्यांतील काही कारणे पुढे दिली आहेत.

 

१. नदीत नाणी टाकणे

सहसा ‘नदीत नाणी टाकणे’, हे शुभ मानले जाते; मात्र त्याला वैज्ञानिक बाजूही आहे. प्राचीन काळी नाणी तांब्यापासून सिद्ध करत असत. तांबे हा धातू शरिरासाठी अत्यंत उपयोगी आहे. त्या काळी नद्या हाच पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत होता; म्हणून आपले वाड-वडील ‘तांबेमिश्रित पाणी सर्वांना पिता यावे’, यासाठी नदीत नाणी टाकत असत; मात्र आता तांब्याची नाणी काळाआड गेली आहेत.

 

२. दोन्ही हात जोडून नमस्कार करणे

भारतीय संस्कृतीत ‘दोन्ही होत जोडून नमस्कार करणे’, ही पद्धत एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी उपयोगात आणली जात होती; मात्र वैज्ञानिक दृष्टीकोनातून दोन्ही हात जोडल्याने बोटांची टोके एकमेकांना स्पर्श करतात. बिंदूदाबन पद्धतीनुसार ही बोटे डोळे, कान आणि मन यांचे दाबबिंदू (बिंदूदाबनाचे/अ‍ॅक्युप्रेशरचे) आहेत. दोन्ही हातांच्या बोटांनी एकमेकांवर दाब दिल्याने वरील दाबबिंदू कार्यरत होतात आणि आपण ज्याला नमस्कार करतो, ती व्यक्ती दीर्घकाळ स्मरणात राहते, तसेच हस्तांदोलन केल्याने होणारा जंतूंचा प्रादुर्भाव टाळता येतो.

 

३. भारतीय विवाहित महिलांनी पायांच्या बोटांत जोडवी घालणे

‘जोडवी घालणे’, हे केवळ विवाहित महिलांसाठी महत्त्वाचे नाही, तर त्यामागे वैज्ञानिक कारणही दडले आहे. सहसा जोडवी ही पायाच्या अंगठ्याच्या शेजारील बोटात घालतात. त्यामुळे स्त्रीच्या गर्भाशयाची क्षमता विकसित होते, तसेच गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा नियंत्रित होऊन मासिक पाळी नियमित येते. चांदी ही उत्तम विद्युत् प्रवाहक असल्याने पृथ्वीतून येणार्‍या ऊर्जेच्या लहरी त्याकडे आकर्षित होऊन त्या शरिरात आकृष्ट होतात.

 

४. कपाळावर टिळा लावणे

कपाळावर दोन डोळ्यांच्या मध्ये ज्या ठिकाणी टिळा लावण्यात येतो, ते स्थान प्राचीन काळापासून मानवी शरिराचे महत्त्वाचे नियंत्रण केंद्र समजले जाते. टिळा लावल्याने शक्तीचा लय टाळला जातो. भ्रूमध्यावर लाल रंगाचा टिळा लावल्याने शरिरात ऊर्जा टिकून राहाते आणि विविध स्तरांवरील एकाग्रता नियंत्रित होते. टिळा लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर आपोआप दाब येतो. त्यामुळे तोंडवळ्याच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा सुलभ होतो.

 

५. देवळात घंटा असणे

देवळात जाणार्‍या व्यक्ती गाभार्‍यात (गर्भागृहात) प्रवेश करण्याआधी घंटा वाजवतात. आगम शास्त्रानुसार घंटा वाजवण्याने वाईट शक्तींचे निर्दालन होते आणि घंटेचा आवाज देवाला आवडतो. वैज्ञानिकदृष्ट्या घंटांचा आवाज आपल्या मनातील अनावश्यक विचार दूर करून बुद्धी तीक्ष्ण करतो आणि भक्तीभाव वाढवतो. घंटा अशा प्रकारे बनवलेली असते की, ती वाजवल्यावर मेंदूचा डावा आणि उजवा भाग एकरूप होतो. जेव्हा आपण घंटा वाजवतो, तेव्हा त्यातून येणार्‍या नादलहरी स्पष्ट असतात आणि त्यांचा प्रतिध्वनी न्यूनतम सात सेकंद टिकतो. त्यामुळे आपल्या शरिरातील सप्तचक्रे (हीलिंग सेंटर्स) कार्यरत असल्याने आपल्या मेंदूतील नकारात्मक विचार नष्ट होतात.

 

६. तुळशीची पूजा करणे

हिंदु धर्मात तुळशीला मातेचे स्थान दिले आहे. जगातील अनेक भागांत तुळशीला धार्मिक आणि आध्यात्मिक स्थान आहे. वैदिक काळातील ऋषिमुनींना तुळशीपासून होणार्‍या लाभाचे ज्ञान होते; म्हणूनच तुळशीला देवतेचे स्वरूप प्राप्त झाले. या ऋषिमुनींनी समाजातील शिक्षित आणि अशिक्षित जनतेला तुळशीच्या झाडांचे संवर्धन करण्याचा उपदेश दिला. तुळस ही मानवासाठी संजीवनी आहे. तिच्यात अनेक वैद्यकीय गुण आहेत. ती उत्कृष्ट जंतूविनाशक आहे. तुळशीचा रस प्रतिदिन प्राशन केल्याने शरिराची रोगप्रतिकार क्षमता वाढते, रोगांपासून संरक्षण होते आणि शारीरिक स्थिती उत्तम राहते. त्यामुळे आयुष्यमानात वाढ होते. घरासमोर तुळशीचे झाड असल्यास डास आणि इतर कीटक घरात प्रवेश करत नाहीत. असे म्हणतात की, साप तुळशीच्या झाडाजवळ जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे प्राचीन काळी घराभोवती तुळशीची अनेक झाडे लावत असत.

 

७. पिंपळाची पूजा करणे

पिंपळाचे झाड सावली देते. ‘याव्यतिरिक्त त्याचे उपयोगही आहेत’, हे सर्वसामान्य लोकांना ठाऊक नाही; कारण पिंपळाला मधुर फळे येत नाही किंवा त्याचे लाकूडही निकृष्ट असते; मात्र ‘पिंपळाचे झाड रात्री प्राणवायू उत्सर्जित करते’, हे आपल्या पूर्वजांना ठाऊक होते. त्यामुळेच त्यांनी ‘पिंपळाचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे’, यांसाठी पिंपळाच्या झाडाला देवतेचे स्थान दिले.

 

८. उत्तर दिशेला डोके आणि दक्षिणेला पाय करून न झोपणे

‘दक्षिणेला पाय करून झोपण्याने वाईट शक्ती अथवा मृत्यू जवळ येतो’, अशी समजूत आहे; मात्र त्यालाही वैज्ञानिक कारण आहे. मानवी शरिराला स्वतःचे चुंबकीय क्षेत्र आहे. त्यालाच हृदयाचे चुंबकीय क्षेत्र म्हणतात. रक्तप्रवाहामुळे असे क्षेत्र सिद्ध होते. पृथ्वी हा एक प्रचंड चुंबक आहे. जेव्हा आपण उत्तर दिशेला डोके आणि दक्षिणेला पाय करून झोपतो, तेव्हा आपले चुंबकीय क्षेत्र अप्रमाणबद्ध होते. त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे विकार निर्माण होऊ शकतात. आपल्या रक्तात लोह असते आणि लोह चुंबकीय वाहक असल्यामुळे उत्तर दिशेला डोके आणि दक्षिणेला पाय करून झोपल्याने शरिरातील लोह मेंदूकडे जमा होते. त्यामुळे ‘डोकेदुखी, स्मरणशक्तीचा अभाव, पदार्थ न ओळखणे आणि मेंदूची झीज मोठ्या प्रमाणात होणे’, हे विकार होतात.

 

९. भूमीवर बसून भोजन करणे

ही केवळ प्रथा नाही. भूमीवर बसणे, म्हणजे सुखासनात बसणे. सुखासन सहसा योगासने करतांना उपयोगात आणले जाते. जेवण करतांना सुखासनात बसल्यावर पचनक्रिया सुधारण्यास साहाय्य होते आणि शरिरातील वहनप्रक्रिया अन्नपचनासाठी एकाग्र होते; मात्र आसंदी-पटल यांवर बसून अथवा उभे राहून भोजन केल्यास पचनक्रिया व्यवस्थित होत नाही.

 

१०. सूर्याला अर्घ्य देणे

हिंदु धर्मात ‘प्रतिदिन सकाळी सूर्यदेवतेला अर्घ्य देऊन त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे’, ही एक रूढी आहे. त्याचे मुख्य कारण, म्हणजे सूर्यकिरण पाण्यावर पडून अथवा प्रत्यक्षपणे डोळ्यांत पडल्याने डोळ्यांना लाभ होतो, तसेच या रूढीचे पालन करण्यासाठी सकाळी उठण्याची चांगली सवय लागते. सकाळचा प्रहर कुठलेही कर्म करण्यासाठी दिवसातील सर्वाधिक परिणामकारक असतो.

 

११. कान टोचणे

भारतीय संस्कृतीत कान टोचण्याला वेगळेच महत्त्व आहे. भारतीय आधुनिक वैद्य आणि तत्त्ववेत्ते यांच्या मते कान टोचल्याने बुद्धी, विचारशक्ती अन् निर्णयक्षमता विकसित होते. अनावश्यक बोलल्याने शक्ती व्यय होते. कान टोचल्याने बोलण्यावर नियंत्रण येते. त्यामुळे उद्धटपणे वागणे न्यून होते आणि कानांचे कुठल्याही रोगांपासून संरक्षण होते. कान टोचून घेण्याची पद्धत पाश्‍चात्त्य देशांतही रूढ होत आहे; मात्र ते लोक त्याचा उपयोग ‘फॅशन’ म्हणून विविध प्रकारचे दागिने घालण्यासाठी करतात.

 

१२. स्त्रियांनी कुंकू अथवा सिंदूर लावणे

विवाहित महिलांनी कुंकू लावण्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. कुंकू हे ‘हळद’ आणि ‘पारद’ यांपासून सिद्ध होते. कुंकू लावल्याने रक्तदाब नियंत्रित होतो, तसेच वैवाहिक जीवन सुखकर होते. त्यामुळेच विधवा महिलांना कुंकू लावणे वर्ज्य आहे. सिंदूर लावण्याचा सर्वाधिक लाभ तो कपाळापासून सहस्रारापर्यंत लावल्याने मिळतो. (‘विवाहहोम झाल्यावर पुरुषांनी स्त्रियांच्या भांगात मंत्रपूर्वक सिंदूर घालावे’, असे विवाहप्रयोगातील ऐरणीदानात सांगितले आहे. गुरुचरित्रात (अध्याय ३१, श्‍लोक ५८) सांगितले आहे, ‘पुरुषाचे आयुष्य वाढावे’, यासाठी स्त्रीने हळदी-कुंकू आणि सिंदूर (सिंदूर आणि शेंदूर निराळे आहेत.) लावावा, तसेच डोळ्यांत काजळ घालावे. गळ्यात कंठसूत्र (मणीमंगळसूत्र) घालावे आणि फणी डोक्यावर असावी, म्हणजे फणी केसांमध्ये खोवून ठेवावी.’ गुरुचरित्रातील या संदर्भावरून ‘पूर्वी स्त्रिया प्रतिदिन सिंदूर लावत असत’, हे स्पष्ट होते.’ – श्री. दामोदर वझे) ‘पारद’ या घटकामुळे ताण-तणाव न्यून होतात. हल्लीच्या कुंकवात पारद नसते.

 

१३. हातावर मेंदी लावणे

मेंदी लावण्याने हातावरील रंग खुलून दिसण्यासमवेतच मेंदीत वैद्यकीय गुणही आहेत. लग्न इत्यादी समारंभांत मनावर ताणतणाव येतो आणि त्यामुळे डोकेदुखी आणि ताप येण्याची शक्यता असते, तसेच जसजशी विवाह तिथी जवळ येते, तसतशी वर आणि वधू यांच्या मनाची घालमेल होऊन त्यांचे शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य बिघडते. मेंदी लावण्याने शरिराला शीतलता मिळते. त्यामुळे शरीर आणि मन यांवरचा तणाव न्यून होतो. हात आणि पाय हे मज्जातंतूंच्या शेवटच्या टोकांचे घरच आहे. त्यामुळे हात आणि पाय यांवर मेंदी लावल्याने मनावरचे ताणतणाव न्यून होतात.

 

१४. भारतीय महिलांनी बांगड्या घालणे

मनुष्याच्या मनगटाची हालचाल इतर अवयवापेक्षा अधिक प्रमाणात असते, तसेच अनेक रोगांचे निदान करतांना मनगटावरील नाडीचीच परीक्षा करतात. बांगड्या घातल्याने त्यांच्या घर्षणाने रक्तप्रवाह सुलभ आणि जलद होतो, तसेच शरिरातून बाहेर पडणार्‍या ऊर्जेची वलये वातावरणात पसरून वाया न जाता परत शरिरातच जातात; कारण बांगड्यांना टोके नसतात आणि ऊर्जेची वलये बाहेर न पडता शरिरातच राहतात.

 

१५. पाया पडतांना चरणांना स्पर्श करणे

सहसा आपण ज्यांच्या पाया पडतो, ते एकतर वयस्कर असतात अथवा पूजनीय असतात. अशा व्यक्ती जेव्हा तुमच्या अहंविरहित नमस्काराचा स्वीकार करतात, तेव्हा त्यांच्या हृदयातून सकारात्मक विचार आणि पायाच्या बोटांतून ऊर्जा (करुणा) बाहेर पडून हाताद्वारे तुमच्या शरिरात संक्रमित होते. अशा रितीने शक्तीप्रवाहाचा परीघ पूर्ण होऊन वैश्‍विक शक्तीत वाढ होते. त्यामुळे दोन जिवांच्या मनांचे आणि हृदयांचे मीलन होते. जरी अशी प्रक्रिया हस्तांदोलनातून अथवा मिठी मारूनही होत असली, तरी त्याचे लाभ ठराविक मर्यादेपुरतेच असतात. तुम्ही जेव्हा दोन्ही हात जोडून पाया पडतात, तेव्हा तुम्ही याचक असता आणि समोरची व्यक्ती दाता असते.

 

१६. तुळशीची पाने दातांनी न चावता केवळ गिळावी

हिंदु धर्मात तुळशीला श्रीविष्णूची पत्नी मानले आहे. त्यामुळे तुळशीची पाने दातांनी चावणे निषिद्ध समजले जाते. वैज्ञानिक दृष्टीकोनातून तुळशीच्या पानात ‘पारद’ हा धातू मोठ्या प्रमाणात असतो. तुळशीची पाने दातांनी चावल्याने हा पारद दातांना लागून दात कमकुवत होतात आणि ते लवकर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘तुळशीची पाने दातांनी न चावता केवळ गिळावीत’, असे धर्मात सांगितले जाते.

संग्राहक : श्री. शिरीष देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०१४)
साभार : SpeakingTree.in हे संकेतस्थळ

Leave a Comment