संतांचे आशीर्वाद

ज्येष्ठ कृष्ण पक्ष सप्तमी ते ज्येष्ठ कृष्ण पक्ष दशमी, कलियुग वर्ष ५११४ (१० ते १४.६.२०१२) या कालावधीत रामनाथी, गोवा येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ पार पडले. या कालावधीत संतांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.

 

१. सनातन संस्थेचे कार्य कौतुकास्पद ! – पू. युश महाराज

पू. युश महाराज म्हणाले, ‘‘सनातन संस्थे’चे नाव मला खूप भावले आहे; कारण सनातन म्हणजे शाश्वत होय. जे सत्य आहे, ते सनातन आहे आणि तोच खरा धर्म आहे. वैज्ञानिक परिभाषेत ही संस्था अध्यात्माचे संशोधन करत आहे, हे कार्य वाखाणण्यासारखे आहे. तसेच सनातन संस्थेच्या आश्रमात साधक स्वतःकडून होणार्‍या चुकांचा अभ्यास करून त्यातून शिकतात, ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. अन्य कोणत्याही संस्थेत असे कार्य होत नाही.

 

२. ह.भ.प. शंकर शेवाळे महाराज, ‘वारकरी संघ’, पुणे.

आश्रम म्हणजे साक्षात् श्रीकृष्णाच्या स्वरूपापर्यंत नेणारे देवालय आहे. ‘सत्ययुग येईलच’, यात काही शंका नाही. प.पू. डॉक्टरांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदाच यापुढे भारताला दिशा देण्याचे काम करील !’

 

३. शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे सचिव स्वामी निर्विकल्पानंद सरस्वती

सनातनमध्ये आपलेपणा जाणवतो, पुढील कार्य एकत्रित करूया !
(प्रयागराज येथे हिंदू राष्ट्र स्थापनेविषयीच्या प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिल्यानंतरचे उद्गार !)

सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला भेट दिल्यावर तुम्हा सर्व साधकांना भेटून मला खूप आपलेपणा जाणवत आहे. मला आमच्याच साधकांमध्ये आल्याचा अनुभव होत आहे. आपण सर्वजण असेच वारंवार भेटत राहूया, सणासुदीला एकमेकांना शुभेच्छा देऊया़ यामुळे आपल्यामधील स्नेह वाढणार आहे. आपणा सर्वांना एकत्रितपणे पुढील कार्य करायचे आहे. शेवटी वन हे वाघाचे रक्षण करत असते आणि वाघ वनाचे रक्षण करत असतो. दोघेजण एकमेकांचे रक्षण करतात. शंकराचार्यांनी तर सनातनला मित्र संघटना म्हटले आहे. त्यातच त्यांचा स्नेह प्रकट झाला आहे, असे शुभाशीर्वचन पुरीच्या श्री गोवर्धनपिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे सचिव स्वामी निर्विकल्पानंद यांनी सनातनच्या प्रदर्शनला सदिच्छा भेट देतांना दिले.

 

४. हिंदूंनो, हिंदु संस्कृती जपून धर्माचे रक्षण करा !
– पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड, जि. सातारा

‘हिंदु धर्मातील संस्कृती जपण्याचे कार्य ‘सनातन संस्था’ करत आहे. तिच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे. हा गोवर्धन पर्वत (संस्कृती जपण्याचे कार्य) हिंदूंचा आहे आणि त्या पर्वताला प्रत्येकाने काठी लावण्याची आवश्यकता आहे. (दैनिक ‘सनातन प्रभात’, १६.६.२००७)

Leave a Comment