वटपौर्णिमेला वडाचे झाड आणि केवळ वडाची फांदी यांच्या पूजनातील भेद

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करणे
आणि वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करणे यांतील भेद

वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाचे मनोभावे पूजन करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे पूजन करणार्‍या स्त्रीला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हल्ली मात्र शहरासारख्या ठिकाणी वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करण्याची चुकीची प्रथा पडली आहे. वटवृक्षाचे पूजन करणे आणि वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करणे यांतील भेद खालील लेखातून समजून घेऊया.

 

१. वडाच्या झाडाचे पूजन करणे (सूक्ष्म-परीक्षण)

१. वडाच्या झाडात परमेश्वरी तत्त्व अगोदरच कार्यरत असणे

२. वटपूजन करतांना स्त्रीमध्ये भावाचे वलय निर्माण होणे

३. ईश्वराशी अनुसंधान होणे

४. पूजा सांगणार्‍या पुरोहिताच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी मंत्रशक्तीचे वलय निर्माण होणे आणि त्याच्या मुखातून मंत्रशक्तीच्या प्रवाहाचे वातावरणात प्रक्षेपण होणे

५. झाडात परमेश्वराकडून निर्गुण तत्त्वात्मक प्रवाह आकृष्ट होणे

६. झाडात निर्गुण तत्त्वात्मक वलय निर्माण होणे

७. झाडात निर्गुण तत्त्वात्मक कण कार्यरत असणे

८. झाडात ईश्वराकडून आनंदाचा प्रवाह येणे

९. आनंदाचे वलय निर्माण होणे

१०. झाडात चैतन्याचा प्रवाह आकृष्ट होणे

११. झाडातून, तसेच त्याच्या पारंब्या आणि इतर भाग यांतून चैतन्याच्या प्रवाहांचे वातावरणात प्रक्षेपण होणे

१२. झाडात, तसेच वातावरणात चैतन्यकणांचे प्रक्षेपण होणे

१३. झाडातून पूजन करणार्‍या स्त्रीकडे चैतन्याच्या प्रवाहाचे प्रक्षेपण होणे

१४. स्त्रीमध्ये चैतन्याचे वलय निर्माण होणे

१५. ईश्वराकडून चैतन्यरूपी आशीर्वादाचा प्रवाह स्त्रीकडे आकृष्ट होणे

१६. स्त्रीच्या शरिरात शक्तीचे वलय निर्माण होणे

१७. तिच्या देहात शक्तीचे कण कार्यरत स्वरूपात फिरणे

१८. तिच्या देहाभोवती संरक्षककवच निर्माण होणे’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्येष्ठ शु. अष्टमी, कलियुग वर्ष ५१११ (३१.५.२००९))

 

२. घरी वडाची फांदी आणून तिचे पूजन
करण्यापेक्षा प्रत्यक्ष वडाच्या पूजेतून अधिक लाभ मिळणे

वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करणे आणि वडाच्या झाडाचे पूजन करणे

वडाच्या मूळ खोडामध्ये अधिक प्रमाणात शिवतत्त्व सामावलेले असल्याने प्रत्यक्ष झाडाची भावपूर्णरित्या पूजा करून ३० प्रतिशत, तर केवळ फांदीच्या पूजेने २ – ३ प्रतिशत एवढ्याच प्रमाणात लाभ मिळण्यास साहाय्य होते. मूळ, खोडविरहित झाडाची फांदी ही झाडाच्या मूळ चेतनेपासून विलग झाल्याने तिच्यामध्ये अचेतनत्व अधिक प्रमाणात असल्याने तिची चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमताही अतिशय नगण्य असते. फांदीतील अचेनत्वाचा परिणाम म्हणून तिची चैतन्य वहन करण्याची क्षमताही अतिशय नगण्य असल्याने घरी वडाची फांदी आणून पूजा करण्याने फारसा लाभ मिळत नाही. ज्या ठिकाणी नैसर्गिकता अधिक असते, त्या ठिकाणी चेतनेचे प्रमाणही अधिक असल्याने चैतन्याच्या फलप्राप्तीचे प्रमाणही अधिक असते. – ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.५.२००६, दुपारी १.४५)

 

३. स्त्रियांनी घरी वडाच्या झाडाच्या फांदीचे पूजन करणे (सूक्ष्म-परीक्षण)

झाडापासून त्याची फांदी वेगळी केल्यास ती निर्जीव बनणे
आणि त्यामुळे वडाच्या झाडाच्या फांदीच्या पूजनाचा फारसा लाभ न होणे

झाडापासून त्याची एखादी फांदी वेगळी केली असता तिच्यातील सजीव धारणा संपते आणि ती फांदी निर्जीव बनते. वटपौर्णिमेच्या दिवशी काही स्त्रिया बाजारातून वडाच्या झाडाची फांदी आणून तिचे पूजन करतात; परंतु स्त्रियांना त्याचा फारसा लाभ होत नाही. असे पूजन करणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा अवयव वेगळा करून तिच्या त्या अवयवाचा वापर करणे होय.

१. वडाच्या झाडाच्या फांदीत तत्त्वस्वरूपात थोड्या प्रमाणात चैतन्य वलयस्वरूपात कार्यरत असणे

२. पूजन करणार्‍या सामान्य स्त्रीमध्ये भाव नसल्यामुळे कर्मकांड केल्याप्रमाणे केवळ करायची म्हणून कृती केल्याने तिच्यामध्ये भावनेचे वलय निर्माण होणे

३. वडाच्या झाडाच्या फांदीतील सजीवत्व संपल्यामुळे तिच्यात रज-तमप्रधान वलय निर्माण होणे

४. या वलयातून वातावरणात तमोगुणी प्रवाहांचे प्रक्षेपण होणे

५. वातावरणात तमोगुणी कणांचे प्रक्षेपण होणे

६. फांदीतील रज-तमप्रधान वलयातून पूजन करणार्‍या स्त्रीच्या दिशेने तमोगुणी प्रवाहाचे प्रक्षेपण होणे

७. स्त्रीमध्ये रज-तमप्रधान वलय निर्माण होणे

८. फांदीच्या वाळणार्‍या पानांवर वायूमंडलातील वाईट शक्तींनी आक्रमण करणे

व्यक्तीला स्वतःच्या सोयीनुसार देव हवा असतो; पण ते शक्य नाही. त्यामुळे अशा प्रकारे पूजन करून कोणाला फारसा लाभ होत नाही.

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, रामनाथी, गोवा. (ज्येष्ठ शु. ८, कलियुग वर्ष ५१११ (३१.५.२००९))

 

४. कागदावर वडाचे चित्र काढून त्याची पूजा
करण्यापेक्षा प्रत्यक्ष वडाच्या पूजेतून अधिक लाभ मिळणे

कागदावर वडाचे चित्र काढून त्याची पूजा करून इष्ट चैतन्याची फलप्राप्ती करण्यासाठी पूजकाची पातळी ५० प्रतिशतच्या पुढे हवी, तरच पूजकाच्या अव्यक्त भावाच्या प्रमाणात चित्राला देवत्व प्राप्त होऊन पूजकाला चैतन्य प्राप्त होते, अन्यथा नाही. नाहीतर याचा सर्वसामान्य जिवाला १-२ प्रतिशत एवढ्या प्रमाणातच लाभ मिळण्यास साहाय्य होते.
– ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.५.२००६, दुपारी २.४५)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment