देवीच्या विविध रूपांची ‘कुलदेवी’ म्हणून उपासना केली जाते. त्यांतील श्री महालक्ष्मी या रूपातील देवीचा नामजप कसा करावा, हे आपण आता समजून घेणार आहोत. तत्पूर्वी श्री महालक्ष्मीची थोडक्यात माहिती पाहूया.
श्री विष्णूशी संबंधित देवता !
श्री महालक्ष्मी, श्री विष्णूशी संबंधित देवता
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक महत्त्वाचे पीठ म्हणजे कोल्हापूर येथील ‘श्री महालक्ष्मीदेवी’ ! श्री दुर्गासप्तशतीनुसार श्री दुर्गादेवीच्या प्रमुख तीन रूपांपैकी ‘श्री महालक्ष्मी’ हे एक रूप आहे. ‘श्री महालक्ष्मी’ ही श्री विष्णूशी संबंधित देवता असून पालनपोषण करणे आणि ऐश्वर्य प्रदान करणे, हे तिचे कार्य आहे.
देवीचा तारक नामजप कसा करावा ?
‘श्री महालक्ष्मीदेव्यै नमः ।’ या नामजपात तारक तत्त्वाचे प्रमाण अधिक असल्याने ‘महालक्ष्मी’ या शब्दातील ‘क्ष्मी’ हे अक्षर उच्चारतांना थोडेसे लांबवावे आणि ‘देव्यै’ या शब्दातील ‘दे’ हे अक्षर जोर न देता म्हणावे. यामुळे नामजपातील तारक तत्त्वाचे प्रमाण वाढते. आता आपण नामजप ऐकूया……
सनातन-निर्मित सात्त्विक नामपट्टी
देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. याविषयीची सविस्तर माहिती ‘नाम’ या लिंकवर उपलब्ध आहे.
Sidhnath dev bhud namasmaran kasekave
नमस्कार,
नामस्मरण कसे करावे याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा – https://www.sanatan.org/mr/a/436.html