श्री सप्तशृंगीदेवीचा नामजप कसा करावा ?

श्री सप्तशृंगीदेवी
श्री सप्तशृंगीदेवी

देवीच्या विविध रूपांची ‘कुलदेवी’ म्हणून उपासना केली जाते. त्यापैकी श्री सप्तश्रृंगीदेवीचा नामजप कसा करावा, हे आपण आता समजून घेणार आहोत. तत्पूर्वी पाहूया, तिची थोडक्यात माहिती.

 

श्री सप्तशृंगीदेवीची वैशिष्ट्ये !

श्री सप्तश्रृंगीदेवी, वणी, नाशिक
श्री सप्तशृंगीदेवी, वणी, नाशिक

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वणी येथे श्री सप्तशृंगीदेवीचे स्थान आहे. देवीचे हे पीठ महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धे पीठ आहे. सप्तशृंग गडावरील एका कड्याच्या टोकावर श्री सप्तशृंगीदेवीचे स्वयंभू स्थान आहे. सिंदूरविलेपित, अष्टादशभुजा, म्हणजे अठरा हात असलेली देवीची ही उभी मूर्ती आहे. या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे ती सकाळी बालक, दुपारी तरुणी आणि सायंकाळी वृद्धेच्या रूपात भासते. प्रत्येक वर्षी चैत्री आणि आश्विन पौर्णिमेला सप्तशृंग गडावर देवीची मोठी यात्रा भरते.

 

देवीचा नामजप करण्याची पद्धत !

आता आपण श्री सप्तश्रृंगीदेवीचा नामजप कसा करावा, ते ऐकूया. ‘श्री सप्तशृंगीदेव्यै नमः ।’ हा नामजप देवीच्या तारक तत्त्वाशी संबंधित असल्याने ‘सप्तशृंगी’ या शब्दातील ‘गी’ हे अक्षर उच्चारतांना थोडेसे लांबवावे. यामुळे भावजागृती लवकर होते.

सनातन-निर्मित सात्त्विक नामपट्टी
सनातन-निर्मित सात्त्विक नामपट्टी

देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. याविषयीची सविस्तर माहिती ‘नाम’ या लिंकवर उपलब्ध आहे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक’

Leave a Comment