श्री योगेश्वरीदेवीचा नामजप कसा करावा ?

श्री योगेश्वरीदेवी

श्री योगेश्वरीदेवी

देवीच्या विविध रूपांची ‘कुलदेवी’ म्हणून उपासना केली जाते. यापैकी श्री योगेश्वरीदेवी या रूपातील देवीचा नामजप कसा करावा, हे आपण आता समजून घेणार आहोत. तत्पूर्वी पाहूया, तिची थोडक्यात माहिती.

श्री योगेश्वरीदेवीची उपासना पद्धत !

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ या स्थानापासून सुमारे सोळा किलो मीटर अंतरावर अंबाजोगाई हे गाव आहे. येथे श्री योगेश्वरीदेवीचे स्थान आहे. या देवीची उपासना कुमारिकेच्या स्वरूपात करतात.

देवीचा तारक जप कसा करावा ?

‘श्री योगेश्वरीदेव्यै नमः ।’ हा नामजप देवतेच्या तारक तत्त्वाशी संबंधित असल्याने ‘योगेश्वरी’ या शब्दातील ‘गे’ हे अक्षर उच्चारतांना थोडेसे लांबवावे. अशा प्रकारे देवतेला आर्त साद घातल्यानेभावजागृती लवकर होते. आता ऐकूया श्री योगेश्वरीदेवीचा नामजप !

सनातन-निर्मित सात्त्यिक नामपट्टी

सनातन-निर्मित सात्त्यिक नामपट्टी

देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. याविषयीची सविस्तर माहिती ‘नाम’ या लिंकवर उपलब्ध आहे.