पापक्षालन करण्यासाठी हनुमंताने केलेल्या पराक्रमांचे स्मरण करा !

भाविकांनो, स्वतःमध्ये भाववृद्धी होण्यासाठी
आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, स्वतःकडून झालेल्या धर्मद्रोहाचे
पापक्षालन करण्यासाठी हनुमंताने केलेल्या पराक्रमांचे स्मरण करा !

हनुमान Hanuman

हनुमान

‘जे बुद्धीवादी ‘हनुमंत म्हणजे केवळ एक मर्कट आहे’, असे वाटून त्यावर टीका करतात, त्यांनी खालील अनुभूतींवर जरूर चिंतन करावे आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा, जे हनुमंताला जमते, ते पृथ्वीतलावरील एकातरी मनुष्याला जमणार आहे का ? बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, तुमच्यापुढे केवळ दोनच पर्याय आहेत, एकतर तुम्ही मारुतीरायाप्रमाणे एकतरी पराक्रम करून दाखवण्यास सिद्ध व्हा किंवा मारुतीचे पुढील अतुलनीय पराक्रम मान्य करून स्वतःचा पराजय स्वीकारण्यास सिद्ध व्हा !

 

१. आकाशात उड्डाण करणे

जन्मतः उगवत्या सूर्याला फळ समजून सूर्य गिळण्यासाठी हनुमानाने आकाशात उड्डाण केले होते.

 

२. स्त्रियांचे रक्षण करणे

२ अ. सुग्रीवाची पत्नी रूमा हिच्या शीलाचे रक्षण करणे

राम-लक्ष्मण यांची सुग्रीवाशी भेट करून देण्यासाठी हनुमानाने पंपा सरोवराच्या परिसरातून ऋष्यमुख पर्वतापर्यंत स्वतःच्या खांद्यावर दोघांना बसवून पर्वताकडे उड्डाण करून नेले. सुग्रीवाची पत्नी रूमा जेव्हा वालीच्या कह्यात होती. तेव्हा तिने हनुमंताचे स्मरण करताच हनुमान प्रगट होऊन वालीपासून तिच्या शीलाचे रक्षण करत असे.

२ आ. सीतेचा शोध

सीतेचा शोध

समुद्र लंघून त्याने लंकेत प्रवेश केला आणि सीतेचा शोध घेऊन तिला श्रीरामाचा निरोप दिला.

 

३. राम-लक्ष्मण यांचे केलेले रक्षण आणि त्यांना विविध प्रकारे केलेले साहाय्य

अ. इंद्रजीताने राम-लक्ष्मण यांवर नाग-पाश टाकून त्यांना विषाने मारण्याचा प्रयत्न केला असता हनुमंताने तत्परतेने विष्णुलोकाकडे धाव घेतली आणि गरूडाचे साहाय्य घेऊन नागपाशातून राम-लक्ष्मण यांची मुक्तता केली.

आ. लक्ष्मण युद्धात घायाळ होऊन मृत्यूमुखी पडू नये, यासाठी हनुमंताने उत्तरेत उड्डाण करून तेथून संजीवनी वनस्पती असणारा द्रोणागिरी पर्वत उचलून आणला.

इ. अहिरावण आणि महिरावण यांनी मायावी सिद्धींद्वारे राम-लक्ष्मण यांना पाताळात नेल्यावर हनुमंताने पाताळात जाऊन त्यांच्याशी युद्ध करून त्यांना नष्ट केले अन् राम-लक्ष्मण यांना सुखरूपपणे पृथ्वीवर आणले.

ई. बिभीषण जरी शत्रूचा बंधू असला, तरी त्याचा मित्र म्हणून स्वीकार करावा आणि सीता अग्नीहूनही पवित्र असल्याने ‘पत्नी म्हणून तिला स्वीकारावे’, हे अनमोल सल्ले हनुमंताने श्रीरामाला दिले.

उ. श्रीरामाच्या सांगण्यावरून आज्ञापालन म्हणून श्रीरामाच्या अवतार समाप्तीनंतर हनुमंताने रामराज्य सांभाळण्यासाठी कुश-लव यांना साहाय्य केले.

 

४. हनुमानाने केलेले आज्ञापालन

अ. महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाच्या दैवी रथावर श्रीकृष्ण भगवंताच्या आज्ञेने हनुमंत आरूढ झाला आणि त्याने धर्माचे रक्षण केले.

आ. श्रीकृष्णाच्या आज्ञेचे पालन म्हणून हनुमंताने सेवाभावाने भीम, अर्जुन, बलराम, गरूड आणि सुदर्शनचक्र यांच्या गर्वहरणाचे महान कार्य केले होते.

 

५. नल-नील वानरांना साहाय्य

श्रीरामाचे नाव शिळेवर कोरून रामसेतू बांधण्यात नल-नील वानरांना साहाय्य केले.

 

६. लंकादहन करणे

शेपटीला आग लावल्यावर अग्नीज्वाला त्याच्या देहाला कोणत्याही प्रकारे इजा करू शकल्या नाहीत, उलट हनुमंताने लंकादहन केले होते.

 

७. हनुमानाची रूपे

अ. सप्तचिरंजीवांच्या रूपाने हनुमंत रक्षण आणि मार्गदर्शन यांचे कार्य करत असतो अन् जेथे जेथे रामाचे गुणगान केले जाते, तेथे तेथे कलियुगातही सूक्ष्मातून उपस्थित राहून रामभक्तांना आशीर्वाद देऊन अभय प्रदान करतो.

आ. हनुमंताची रामाप्रतीची निस्सीम दास्यभक्ती आणि शौर्य यांमुळे दासमारुती अन् वीरमारुती ही त्याची २ रूपे विख्यात आहेत. आवश्यकतेनुसार हनुमंत ती रूपे धारण करून तसे कार्य करत असतो.

इ. हनुमंताच्या सूक्ष्म-रूपाने आपल्या अंतःकरणातील अहंकाररूपी रावणाच्या लंकेचे दहन केल्यावर आपल्या हृदयात रामराज्याला आरंभ होतो, हे साधना करणार्‍या कोणत्याही जीवाने विसरता कामा नये.’

– श्रीकृष्ण (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, चैत्र शु. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११४ (२३.३.२०१२) रात्री ११.४०))

Leave a Comment