श्रीधरस्वामीकृत् श्रीहनुमत्स्तोत्रम्

सुखैकधामभूषणं मनोजगर्वखण्डनम् ।
अनात्मधीविगर्हणं भजेऽहमञ्जनासुतम् ॥ १ ॥

भवाम्बुधिं तितीर्षुभिः सुसेव्यमानमद्भुतम् ।
शिवावतारिणं परं भजेऽहमञ्जनासुतम् ॥ २ ॥

गुणाकरं कृपाकरं सुशान्तिदं यशस्करम् ।
निजात्मबुद्धिदायकं भजेऽहमञ्जनासुतम् ॥ ३ ॥

सदैव दुष्टभञ्जनं सदा सुधर्मवर्धनम् ।
मुमुक्षुभक्तरञ्जनं भजेऽहमञ्जनासुतम् ॥ ४ ॥

सुरामपादसेविनं सुरामनामगायिनम् ।
सुरामभक्तिदायिनं भजेऽहमञ्जनासुतम् ॥ ५ ॥

विरक्तमण्डलाधिपं सदात्मवित्सुसेवितम् ।
सुभक्तवृन्दवन्दितं भजेऽहमञ्जनासुतम् ॥ ६ ॥

विमुक्तिविघ्ननाशकं विमुक्तिभक्तिदायकम् ।
महाविरक्तिकारकं भजेऽहमञ्जनासुतम् ॥ ७ ॥

सुखं यदेवमद्वयं बृहत्त्वमेव तत् स्वयम् ।
इतीह बोधकं गुरुं भजेऽहमञ्जनासुतम् ॥ ८ ॥

विरक्तिमुक्तिदायकं इमं स्तवं सुपावनम् ।
पठन्ति ये समादरात् न संसरन्ति ते ध्रुवम् ॥ ९ ॥

॥ इति श्री श्रीधरस्वामी विरचितं श्रीहनुमत्स्तोत्रम् संपूर्णम् ॥

अर्थ : अत्यंत सुखदायक अशा स्थानाला अलंकृत करणारा, मदनाचं गर्वहरण करणारा, ज्यांना आत्मज्ञान नाही, अशांचं अज्ञान दूर करणारा अशा अंजना (टीप) पुत्राला आम्ही भजतो. ।।१।।

भवसागर तरू इच्छिणारे ज्याला भजतात, अशा अद्भुत, शिवाचा अवतार असणार्या परम अशा अंजनापुत्राला आम्ही भजतो. ।।२।।

गुणांचा सागर, कृपेचं भांडार, शांती व यश देणारा, निज आत्मबुध्दिदायक अशा अंजनापुत्राला आम्ही भजतो. ।।३।।

सदा दुष्टांचा नाश करणारा, सुधर्माची वाढ करणारा, मोक्षार्थी भक्तांचे रंजन करणारा, अशा अंजनापुत्राला आम्ही भजतो. ।।४।।

श्रीरामाचे पादसेवन करणारा, श्रीरामाचे नामगायन करणारा, श्रीरामभक्ती देणारा अशा अंजनापुत्राला आम्ही भजतो. ।।५।।

वैराग्यसंपन्न असलेला, जो आत्म्याचं खरं स्वरूप आहे, भक्तांकडून वंदनीय अशा अंजनापुत्राला आम्ही भजतो. ।।६।।

मुक्तिमार्गातील विघ्नांचा नाश करणारा, मोक्षाची भक्ती प्रदान करणारा, महाविरक्तिकारक आशा अंजनापुत्राला आम्ही भजतो. ।।७।।

ज्याच्यासारखं दुसरं सुख नाही, जो स्वत:च महान आहे. जो या लोकात बोधप्रद आहे. जो गुरु आहे, अशा अंजनापुत्राला आम्ही भजतो. ।।८।।

विरक्ती व मुक्ती देणारं हे स्तोत्र पुण्यप्रद आहे. जे भक्त हे स्तोत्र आदराने पठन करतील, ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतील हे नक्की. ।।९।।

अशा रितीने हे श्रीधरस्वामी विरचित हनुमत् स्तोत्र पूर्ण झालं.

टीप : ‘अंजना’ म्हणजे मारुतीची आई  ‘अंजनी’ !

– श्री. भालचंद्र जोशी, चारकोप, मुंबई.  (७.४.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment