शनिस्तोत्र

कोणस्थ: पिङ्गलो बभ्रु: कृष्णो रौद्रोऽन्तको यमः ।
सौरिः शनैश्‍चरो मन्दः पिप्पलादेन संस्तुतः ॥

एतानि दश नामानि प्रातरुत्थाय य: पठेत् ।
शनैश्‍वरकृता पीडा न कदाचित् भविष्यति ॥

पिप्पलाद उवाच । नमस्ते कोणसंस्थाय पिङ्गलाय नमोऽस्तुते ।
नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोऽस्तुते ॥ १ ॥

नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चान्तकाय च ।
नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो ॥ २ ॥

नमस्ते मन्दसंज्ञाय शनैश्‍चर नमोऽस्तुते ।
प्रसादं कुरु देवेश दीनस्य प्रणतस्य च ॥ ३ ॥

अर्थ : कोणस्थ, पिंगल, बभ्रु, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरि, शनैश्‍चर आणि मंद या दहा नावांनी पिप्पलादऋषींनी शनिदेवाची स्तुती केली. ही दहा नावे सकाळी उठल्यावर जो म्हणील, त्याला कधीही शनिग्रहाची बाधा होणार नाही.

पिप्पलादऋषी म्हणतात, ‘‘हे कोनात रहाणार्‍या कोणस्था, हे पिंगला, हे बभ्रु, हे कृष्णा, हे रौद्रदेहा, हे अंतका, हे यमा, हे सौरी, हे विभो, हे मंदा, हे शनिदेवा, मी तुला नमस्कार करतो. मी दीन तुला शरण आलो आहे. तू माझ्यावर प्रसन्न हो.’’

हे स्तोत्र नित्य प्रात:काळी पठण करावे.

Leave a Comment