बगलादिगबंधन स्तोत्र

साधकांनी काळानुसार बगलामुखी देवीला भावपूर्ण प्रार्थना
करून सकाळी अन् संध्याकाळी देवीचे बगलादिगबंधन स्तोत्र ऐकावे !

सध्या साधकांना ७ व्या पाताळातील वाईट शक्ती मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत. या वाईट शक्तींशी सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्तरांवर एकाच वेळी सूक्ष्मातून लढावे लागत आहे. काळानुसार श्रीकृष्णाचा नामजप आणि प्राणवहन पद्धतीनुसार शोधलेले नामजप हे साधकांचे वाईट शक्तींच्या त्रासांपासून निर्गुण स्तरावर रक्षण करत आहेत. साधकांचे सगुण स्तरावर रक्षण होण्यासाठी त्यांनी काळानुसार देवीला भावपूर्ण प्रार्थना करायला हवी. त्याचबरोबर बगलामुखीदेवीचे बगलादिगबंधन स्तोत्र हे २० मिनिटांचे स्तोत्र सकाळी आणि संध्याकाळी ऐकल्याने त्यांना होणार्‍या त्रासांमध्ये घट होऊन त्यांच्याभोवती देवीचे संरक्षककवच निर्माण होईल. त्यामुळे सूक्ष्म स्तरासह स्थुलातून होणार्‍या त्रासातही पुष्कळ प्रमाणात घट होते.

टीप : बगलादिगबंधन स्तोत्राचा ऑडिओ पुढील लिंकवर उपलब्ध आहे.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (१४.७.२०१९, रात्री ११.१७)