आदित्यहृदय स्तोत्र

साधकांना हृदयाशी संबंधित होणारे त्रास होत असल्यास पुढील उपाय करावेत !

सध्या साधकांना ७ व्या पाताळातील वाईट शक्ती मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत. या त्रासांमुळे काही साधकांना छातीवर दाब जाणवणे, श्‍वास घेतांना त्रास होणे, अस्वस्थ वाटणे, छातीत कळा येणे, यांसारखे त्रास होतात. प्राणवहनपद्धतीने नामजप शोधून काढेपर्यंत साधक पुढील आध्यात्मिक उपाय करू शकतात.

अ. दैनिक सनातन प्रभातने छातीवरील आवरण काढणे

आ. छातीच्या समोर रिकाम्या खोक्याचे तोंड आतील दिशेला करून ठेवणे

इ. छातीला कापराची पूड किंवा विभूती लावणे

ई. सूर्यदेवाला हृदयाचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करणे

उ. आदित्यहृदय स्तोत्र लावून या स्तोत्रातील चैतन्यामुळे स्वत:च्या हृदयाच्या भोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी सूर्यदेवाला प्रार्थना करून हे स्तोत्र सलग ३ वेळा ऐकावे, तरीही त्रास न्यून न झाल्यास ७ वेळा ऐकावे आणि तरीही त्रास न्यून न झाल्यास ११ वेळा ऐकावे.

 

 

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी गोवा.