चेन्नई येथे सनातन संस्थेच्या वतीने सत्संग महोत्सव

‘कर्मफलन्याय’ या विषयावर मार्गदर्शन करतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

चेन्नई – येथील कोला पेरुमल शाळेमध्ये ७ एप्रिल या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने सत्संग महोत्सव आयोजित करण्यात आला. सत्संगाच्या प्रारंभी सनातन संस्थेच्या सौ. सुधा यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यांनी रामनवमी आणि तमिळ नववर्ष यांविषयी महत्त्व सांगितले. या वेळी मेणबत्ती आणि तुपाचा दीप यांविषयी सूक्ष्म प्रयोग करण्यात आला. तुपाच्या दिपाकडे पाहून सर्वांना चांगले वाटले. त्यानंतर सौ. भुवनेश्‍वरी यांनी त्यामागचे शास्त्र सांगितले.

सौ. कल्पना बालाजी यांनी पंचतत्त्वांनुसार आध्यात्मिक उपाय याविषयी सविस्तर माहिती  सांगितली. या वेळी त्यांनी सात्त्विक नामपट्टी, अत्तर, कापूर, उदबत्ती, गोमूत्र, रिकामा खोका, सनातन प्रभातचा अंक यांचा आध्यात्मिक उपायासाठी कसा वापर करायचा, याविषयी सांगितले. पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी ‘कर्मफलन्याय’ याविषयी माहिती दिली. त्यानंतर प्रश्‍नोत्तराचे सत्र झाले. अनेकांनी साधना आणि कर्म यांविषयी शंकानिरसन करून घेतले.  या सत्संगाला २८ जिज्ञासू उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात