अनेक सण, उत्सव आणि व्रते यांद्वारे देवतांची कृपा प्राप्त करून घेेण्याची शिकवण देणार्‍या अन् मानवाचे आयुष्य समृद्ध आणि आनंदी करणार्‍या आश्‍विन मासाचे महत्त्व !

१. आश्‍विन मासातील महत्त्वपूर्ण सण

‘आश्‍विन मासात शारदीय नवरात्र, विजयादशमी, कोजागरी पौर्णिमा, वसुबारस (गुरुद्वादशी), धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, तसेच इंद्र, कुबेर आणि लक्ष्मी यांचे पूजन हे महत्त्वाचे सण आहेत.

१ अ. देवीचे नवरात्र

आश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून चालू होणार्‍या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास ‘शारदीय नवरात्र’ असेही म्हणतात. नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म आहे. राम आणि रावण यांच्या युद्धाच्या वेळी रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्रीत देवीपूजन केले होते.

१ आ. नवरात्र व्रताचे प्रकार

नवरात्रात पुढील ५ व्रते आहेत.

१. प्रतिपदा ते नवमी : ९ दिवसांचे संपूर्ण नवरात्री व्रत

२. प्रतिपदा ते सप्तमी : सप्तरात्री व्रत

३. पंचमी ते नवमी : ५ रात्री व्रत

४. सप्तमी ते नवमी : ३ रात्री व्रत

५. केवळ अष्टमी : १ दिवसाचे व्रत

१ इ. नवरात्राची प्रमुख ४ अंगे

देवता स्थापना, मालाबंधन,   नंदादीप लावणे, कुमारिका पूजन

१ ई. स्कंद पुराणानुसार कुमारिका पूजनाचे मिळणारे फळ

१ उ. नवरात्रात सप्तशती पाठ श्रवण करण्याचे महत्त्व

सप्तशती पाठातील एक एक अक्षर अग्नीसमान आहे. मार्कंडेय पुराणात देवी सांगते, ‘जो मनुष्य माझे माहात्म्य श्रवण करील, त्याच्या सर्व पीडांचे मी हरण करीन. ‘दुष्ट स्वप्ने आणि उग्र ग्रहपीडा असतांना सप्तशती पाठाचे श्रवण केल्यास त्या दूर होतील’, असे देवी देवीमाहात्म्यात सांगते. राहू कालात सप्तशती पाठाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. आश्‍विन मासातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते. याच दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती झाली; म्हणून या तिथीस ‘महाअष्टमी’ असे म्हणतात.

१ ऊ. ‘नवरात्रातील प्रत्येक वारी देवीला कोणता नैवेद्य दाखवावा ?’, याविषयी देवीभागवत ग्रंथातील वर्णन

१ ए. नवरात्रात प्रामुख्याने खालील स्तोत्रांचे वाचन करावे !

नवरात्रात प्रामुख्याने दुर्गास्तोत्र वाचन, महालक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र, रामरक्षा, श्रीसूक्त, देव्यपराध स्तोत्र आणि शूलिनी दुर्गा सुमुखी स्तोत्र आदी स्तोत्रांचे वाचन करावे.

१ ऐ. नवरात्रात पुढील नियमांचे पालन करावे !

या नियमांचे पालन केल्याने भक्तीभाव अधिक वृद्धींगत होतो. ते नियम पुढीलप्रमाणे – सात्त्विक अन्नाचे सेवन, ब्रह्मचर्य पालन, दाढी आणि केशकर्तन न करणेे, गादीवर वा पलंगावर न झोपणे

१ ओे. तिथीनुसार आश्‍विन मासातील दिवसांचे महत्त्व

 

२. विजयादशमी

या दिवशी प्रभु श्रीरामचंद्राने रावणाचा वध केला. ‘वाईट प्रवृत्तीवर सत् प्रवृत्ती विजय मिळवते’, ही गोष्ट दर्शवणारा हा दिवस आहे. विजयादशमी हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे.

२ अ. जम्बुद्रीपात

आपल्या भारतवर्षात तीन ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पावसाळा नुकताच संपला आहे. शेतीची कामे जवळपास पूर्ण झालेली आहेत. शेतात पिके डोलू लागलेली आहेत, अशा वेळी दसरा हा सण येतो. घरातील कुलाचार संपलेले असतात आणि आता बाहेर पडून कर्तृत्व गाजवण्यासाठी मन अधीर झालेले असते. या दिवशी बाहेर पडून अनेकांनी विजय संपादन केले. यामुळे विजयाचा पायंडा असलेल्या या दिवसाची गणना साडेतीन मुहुर्तांत केली जाऊ लागली.

 

३. कोजागरी पौर्णिमा

३ अ. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री कुबेरादी देवतांचे पूजन करणे

संपत्ती मिळवणे, तिचा संग्रह करणे आणि तिचा योग्य उपयोग करणे, यांसाठी निरोगी आयुष्य लाभणे आवश्यक आहे. या सर्व घटकांसाठी कोजागरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी, कुबेर, इंद्र आणि चंद्र यांची पूजा करतात. या सर्व देवतांचे पूजन करून मुख्य दारात तुपाचा दिवा लावावा. श्री दत्तगुरूंनी या दिवशी परशुरामाला ‘श्री विद्या’ प्रदान केली. आपल्यालाही सर्व प्रकारचे वैभव प्राप्त व्हावे; म्हणून देवतांचे पूजन करून श्रीसूक्ताचा पाठ करावा.

 

४. दीपावली

आश्‍विन मासातील कृष्ण पक्षात द्वादशीपासून अमावास्येपर्यंत अन् कार्तिक प्रतिपदा आणि द्वितीया अशी एकूण सहा सणांची एकत्र गुंफण म्हणजे ‘दीपावली’ असते.

४ अ. वसुबारस

दिवाळीचा आरंभ ‘वसुबारस’पासून होतोे. भारत कृषीप्रधान देश असल्याने शेती, मानवी आरोग्य, संस्कार आदींचा विचार करून सर्वांत मोठ्या सणाच्या वेळी गोमातेचे स्मरण करत तिची पूजा करणे, ही एक प्रकारची कृतज्ञताच आहे.

४ आ. धनत्रयोदशी

‘धनत्रयोदशी’ म्हणजे एकत्रित तीन सण होत. समुद्र मंथनातून प्राप्त झालेले अमृत हे ‘१४ वे रत्न’ म्हणून ओळखले जाते. या दिवशी त्यातील धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी श्री लक्ष्मी, विष्णु, कुबेर, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्ये यांची पूजाही करतात. या दिवशी यमधर्माला दीपदान करण्याची प्रथा चालू झाली आहे.

४ इ. नरक चतुर्दशी

नरकासुराच्या वधानंतरचा आनंदोत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे.

४ ई. लक्ष्मीपूजन

दिवाळीतील अमावास्येच्या दिवशीची ही महत्त्वाची पूजा असते. श्री लक्ष्मीमातेची यथासांग पूजा झाल्यावर तिला फळे अर्पण करून नैवेद्य दाखवला जातो. नंतर आरती करतात आणि शेवटी प्रसादासह आनंदही वाटला जातो.’

– श्री. चिंतामणी देशपांडे (गुरुजी) (संदर्भ : मासिक ‘शिवमार्ग’, दसरा २०१६)

Leave a Comment