प्रतिष्ठितांची मते

श्रीमती हिमानी सावरकर, अध्यक्षा, हिंदु महासभा

श्रीमती हिमानी सावरकर
श्रीमती हिमानी सावरकर

‘अडचणीत असलेल्या हिंदूंना साहाय्य करणे, हा सनातन संस्थेचा बाणा आहे. संस्था समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी अहोरात्र कार्यरत असते. खर्‍या अर्थाने ही हिंदूंची संस्था आहे.’ – श्रीमती हिमानी सावरकर, अध्यक्षा, हिंदु महासभा.

 

सुप्रसिद्ध भागवत प्रवचनकार सौ. शैलजा सराफ

‘सनातन संस्थेचे कार्य समर्थ रामदासस्वामी यांना अपेक्षित असे ईश्‍वरी उपासनेच्या अधिष्ठानाने युक्‍त आहे. हे कार्य प्रचंड प्रमाणात वाढले पाहिजे. मलाही यात सहभागी व्हावेसे वाटते.’ – सुप्रसिद्ध भागवत प्रवचनकार सौ. शैलजा सराफ

 

श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई

अध्यात्मवादी होण्याचा सनातन संस्थेचा आग्रह !

श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी
श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी

‘आध्यात्मिक होणे, म्हणजे काय हे समजावून सांगितले पाहिजे. आध्यात्मिक होणे, म्हणजे परिपूर्ण हिंदु होणे. आजच्या भाषेत कट्टर हिंदु होणे; परंतु हिंदु आणि मुसलमान यांच्या कट्टरपणात किंवा कर्मठपणात अंतर आहे. मुसलमान जेव्हा कट्टर बनतो, तेव्हा तो जिहादी बनतो, दहशतवादी होतो. ‘मुसलमान व्हा’ किंवा ‘मरा’, असे दोनच पर्याय तो लोकांसमोर ठेवतो; कारण सगळे जग त्याला इस्लाममय करायचे असते. तेव्हा मुसलमानाने कट्टर होणे, हा त्याच्या शेजारच्या माणसाला जसा धोका आहे, तसा जागतिक शांततेलाही धोका आहे; म्हणून जागतिक शांतता साध्य करण्याचा मार्ग मुसलमानांना आध्यात्मिक करणे हा आहे; परंतु अध्यात्मवादाचे सर्वांत अधिक आणि अनुभवी पुरस्कर्ते हिंदु असून ते अध्यात्मवादी झाल्यावाचून मुसलमान अध्यात्मवादी कसे होतील ? म्हणून सनातन संस्थेने हिंदूंना अध्यात्माच्या गंगेत अवगाहन करायला लावायचे ठरवले आहे.

हिंदु आध्यात्मिक होतो, तेव्हा धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) होऊन जागतिक नागरिक बनतो. सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ ग्रंथाचे शेवटचे वाक्य ‘खरा हिंदु तो, जो शेवटी हिंदु रहात नाही’, असे आहे. हे अध्यात्मच आहे. सावरकर मनुजमंगलाचे तत्त्वज्ञान सांगतात, तेव्हा ते अध्यात्म सांगत असतात. सावरकरांसारखा राजकारणी माणूस जर शेवटी अध्यात्म प्रतिपादित असेल, तर ईश्‍वरी राज्याची संकल्पना साकार करण्यासाठी धडपडणारी सनातन संस्था अध्यात्म नाही, तर दुसरे काय शिकवणार ?’

– श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

 

श्री. वामनराव देशपांडे, ‘दासबोधा’चे ज्येष्ठ अभ्यासक

बेभान होऊन सेवा करणे, हा सनातनचा धर्म !

‘आजपर्यंत मी अनेक मठ आणि आश्रम यांना भेट दिली आहे; परंतु सनातनच्या आश्रमातील साधकांची नम्रता, प्रेमभाव, पाहुणचार आणि साधक करत असलेली सेवा पाहून मी थक्क झालो. घरच्या माणसांपेक्षाही सनातनचे साधक इतरांची जास्त काळजी घेतात. बेभान होऊन सेवा करणे, हा सनातनचा धर्म आहे. असे मला अन्य आश्रम आणि मठ येथे पहायला मिळालेले नाही.’ – श्री. वामनराव देशपांडे, ‘दासबोधा’चे ज्येष्ठ अभ्यासक

 

श्री. विष्णु सोनावणे, अध्यक्ष, मुंबई महापालिका वार्ताहर संघ, मुंबई

हेवा वाटण्यासारखे हिंदु धर्मजागृतीचे कार्य करणारी
आणि प्राचीन हिंदु धर्म विज्ञानाशी जोडणारी सनातन संस्था !

‘सनातन करत असलेले हिंदु धर्मजागृतीचे कार्य हेवा वाटावा, असे मोठे आहे. विविध विषयांतील ग्रंथ आणि अन्य माध्यमे यांद्वारे प्राचीन हिंदु धर्म सनातनने विज्ञानाशी जोडला आहे. आतापर्यंत सनातनला होणार्‍या विरोधाविषयी आम्ही केवळ ऐकले होते; मात्र आज तो विरोध जाणून घेता आला. या विरोधाच्या विरुद्ध लढण्यासाठी मुंबई महापालिका वार्ताहर संघाचा सनातनला सदैव पाठिंबा राहील.’ – श्री. विष्णु सोनावणे, अध्यक्ष, मुंबई महापालिका वार्ताहर संघ, मुंबई.

 

श्री. बजरंग पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना, सांगली

सनातन संस्थेच्या माध्यमातून हिंदूंना
धर्मशिक्षण देणारे कार्यकर्ते घडवणारे प.पू. डॉ. जयंत आठवले !

‘प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून भारतात नव्हे, तर जगातील हिंदूंसाठी धर्मशिक्षण आणि राष्ट्रजागृती यांचे कार्य आरंभले आहे. त्यांनी धर्माचे शिक्षण देणार्‍या कार्यकर्त्यांची पिढी घडवली आहे.’ – श्री. बजरंग पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना, सांगली.

 

शिवसेना आणि भाजप या पक्षांचे महाराष्ट्रातील ६ खासदार

मनुष्यजातीचे हित साधणार्‍या सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक आणि
धार्मिक संघटनांचे महत्त्व जाणणारे धर्मप्रेमी शिवसेना आणि भाजप यांचे लोकप्रतिनिधी !

‘भारत हा जगाचा आध्यात्मिक गुरु आहे. सनातनसारख्या आध्यात्मिक आणि धार्मिक संघटना या भारताची खरी शक्‍ती आहेत. अशा संस्थांचे मार्गदर्शन आणि शिकवण यांमुळे मनुष्यजातीचे हित होत आहे. त्यामुळे अध्यात्मातील अग्रगण्य असणार्‍या सनातन संस्थेवर बंदी आणणे, हे अन्यायकारक आहे. – शिवसेना आणि भाजप या पक्षांचे महाराष्ट्रातील ६ खासदार (डिसेंबर २००९ मध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांना या खासदारांनी पाठवलेले पत्र)

 

श्री. शरद शहा, अध्यक्ष, ‘चेंबर ऑफ कॉमर्स’, सांगली

धर्मप्रेम निर्माण करून राष्ट्रजागृती करणारी सनातन संस्था !

‘सनातन संस्था ही समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्‍नरत आहे. ही संस्था नागरिकांत धर्मप्रेम निर्माण करून राष्ट्रजागृती करण्याचे बहुमोल कार्य करत आहे’ – श्री. शरद शहा, अध्यक्ष, ‘चेंबर ऑफ कॉमर्स’, सांगली. (सनातनवर येणार्‍या संभाव्य बंदीच्या संदर्भात ‘चेंबर ऑफ कॉमर्स’च्या नावे राष्ट्रपतींना जानेवारी २०१० मध्ये पाठवलेले पत्र)

 

श्री. शरद पोंक्षे, प्रसिद्ध मराठी अभिनेते

श्री. शरद पोंक्षे
श्री. शरद पोंक्षे

‘एक दिवस सनातन संस्था सर्वोच्च हिंदु संस्कृतीला जगभरात सर्वोच्च स्थान मिळवून देईल, यात शंका नाही !’ – श्री. शरद पोंक्षे, प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात नथुराम गोडसे यांची मध्यवर्ती भूमिका साकारणारे अभिनेते

 

श्री. सूर्यकांत पाठक, कार्यकारी संचालक, ग्राहक पेठ, पुणे

‘सनातन संस्था ही सेवाभावी संस्था असून ती हिंदु धर्माविषयी लोकांमध्ये प्रेम, आदर त्याचप्रमाणे धर्मजागृती निर्माण करण्याचा प्रयत्‍न करणारी संस्था आहे.’ – श्री. सूर्यकांत पाठक, कार्यकारी संचालक, ग्राहक पेठ, पुणे.

 

आमदार राजन विचारे, ठाणे

हिंदुत्व रक्षणासाठी सिंहाचा वाटा उचलणार्‍या सनातनला पाठिंबा देणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य !

‘हिंदुत्व हाच आमचा श्‍वास आहे. हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे यांचा सनातनला पूर्ण पाठिंबा आहे. सनातन हिंदुत्व रक्षणासाठी सिंहाचा वाटा उचलत आहे. त्यामुळे सनातनला पाठिंबा देणे, हे प्रत्येक धर्माभिमानी हिंदूचे कर्तव्य आहे. आम्ही पूर्ण शक्‍तीनिशी तुमच्या पाठीशी उभे आहोत. सनातनच्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास द्यायचा प्रयत्‍न केल्यास संपूर्ण हिंदु समाज रस्त्यावर उतरेल.’ – आमदार राजन विचारे, ठाणे

 

श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदु महासभेचे डोंबिवली शहरप्रमुख

श्री. दुर्गेश जयवंत परुळकर
श्री. दुर्गेश जयवंत परुळकर

सनातन संस्था आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय शिक्षण देते !’ – श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदु महासभेचे डोंबिवली शहरप्रमुख

 

राष्ट्रीय प्रवचनकार श्री. सु.ग. शेवडेगुरुजी

हिंदु धर्माचे सिद्धांत श्रद्धेने, निष्ठेने अन् कटाक्षपूर्वक अपरिवर्तनीय
मानून त्याचा प्रसार करण्याचे कार्य सनातन संस्था जिद्दीने करत आहे !

राष्ट्रीय प्रवचनकार श्री. सु.ग. शेवडेगुरुजी
राष्ट्रीय प्रवचनकार श्री. सु.ग. शेवडेगुरुजी

 

‘हिंदु धर्माचे सिद्धांत श्रद्धेने, निष्ठेने आणि कटाक्षपूर्वक अपरिवर्तनीय मानून त्याचा प्रसार होणे आवश्यक आहे. आज असे शेकडो धर्मप्रसारक निर्माण होण्याची आवश्यकता आहे आणि सनातन संस्था हे कार्य जिद्दीने करत आहे. सनातन संस्थेच्या नावामध्ये ‘सनातन’ असा शब्द आहे. सध्याच्या काळात दुर्दैवाने ‘सनातन’ हा शब्द उच्चारण्यासही धारिष्ट्य असावे लागते. आज ‘हिंदु’ हा शब्दही अस्पृश्य बनला आहे. सनातन तो अभिमानाने उच्चारत आहे किंबहुना हिंदु धर्मातील मूळ वैदिक परंपरा जशीच्या तशी स्वीकारत आहे. हे खरोखरीच कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे सनातन संस्थेप्रती जवळीक वाटत आहे.’

– राष्ट्रीय प्रवचनकार श्री. सु.ग. शेवडेगुरुजी

 

पंडित श्री. अतुलशास्त्री भगरे गुरुजी, नाशिक

‘जर राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही करावयाचे असेल, तर सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात डोळे झाकून सामील व्हा !’ – पंडित श्री. अतुलशास्त्री भगरे गुरुजी, नाशिक.

 

ज्येष्ठ युद्ध पत्रकार श्री. मिलिंद गाडगीळ

सनातन संस्थेला अभिप्रेत ईश्‍वरी राज्यात हिंदुस्थानचे वैभव पुन्हा येईल !

ज्येष्ठ युद्ध पत्रकार श्री. मिलिंद गाडगीळ
ज्येष्ठ युद्ध पत्रकार श्री. मिलिंद गाडगीळ

‘हिंदूंचे हे राज्य त्यातही ‘सनातन संस्थे’ला अभिप्रेत असे ‘ईश्‍वरी राज्य’, हिंदवी राज्य स्थापन झाले आणि त्याचा जगात प्रभाव वाढला, तर केवळ हिंदुस्थानचेच कल्याण होणार आहे, असे नाही, तर सार्‍या जगाचे कल्याण होणार आहे. असा मला दृढ विश्‍वास वाटतो. मी कोणत्याही अंधश्रद्धेपोटी बोलत नाही; कारण मी स्वा. सावरकरांचा अनुयायी आहे आणि प्रचंड बुद्धीनिष्ठ आहे. त्यामुळे एखादी गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून-पुसून घेतल्याविना त्याचा उच्चार करायचा नाही, हे मी कटाक्षाने पाळतो. त्यामुळे मी जेव्हा एखादी गोष्ट बोलतो, तेव्हा त्या गोष्टीचा सर्व बाजूने साकल्याने साधकबाधक विचार करून बोलतो. केवळ श्रद्धेपोटी किंवा तुम्हाला दोन घटिका आनंद वाटावा, असे काहीतरी बोलावे; म्हणून मी हे बोलत नाही. हा माझ्या अंतःकरणापासून दृढ विश्‍वास आहे की, हिंदूंचे ईश्‍वरी राज्य हे जगाच्या कल्याणाला प्रेरक ठरणार आहे, ही वस्तूस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे.’

– ज्येष्ठ युद्ध पत्रकार श्री. मिलिंद गाडगीळ

Leave a Comment