देहली आणि हरियाणा येथील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग !

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना कु. मनीषा माहुर

नवी देहली – श्रीकृष्ण जन्माष्टमीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, हा नामजप केल्याने श्रीकृष्णाची शक्ति मिळते. श्रीकृष्णप्रमाणे आदर्श होण्यासाठी प्रतिदिन आई-वडिलांना नमस्कार केला पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या साधिका कु. मनीषा माहुर यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करोल बाग येथील उदासीन आश्रमात बालसंस्कार समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. या वेळी मुलांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या वेळी बालसंस्कार केंद्राचे देहली प्रांत प्रमुख श्री. वेणू गोपाल हेही उपस्थित होते.

१. जन्माष्टमीनिमित्त देहलीच्या अलकनंदास्थित संतोषी माता मंदिर आणि मालवीय नगर येथील शिवमंदिरात सनातन संस्थेकडून प्रवचन आयोजित करण्यात आले.

२. के.जी.के.-२ येथील सनातन धर्म मंदिरामध्ये ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचा २०० जिज्ञासूंनी लाभ घेतला.

३. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये सनातन धर्म प्रचारणी सभेने आयोजित केलेल्या कार्यक्रमातही सनातन संस्थेकडून ग्रंथ आणि फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

४. जन्माष्टमीविषयी शास्त्रीय भाषेत माहिती देणार्‍या ४०० माहिती पत्रकांचेही या वेळी वितरण करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment