सात्त्विक आकाशकंदिल

सात्त्विक आकाशकंदिल

सात्त्विक आकाशकंदिलाचा आकार शून्याप्रमाणे का आहे ?

१. निर्गुण तत्त्व आकृष्ट होणे

आकाशकंदिलाच्या शून्यात्मक आकारातून वातावरणात संचारणात्मक स्थितीस्वरूपात असलेले निर्गुण तत्त्व भोवर्‍याच्या स्वरूपात आकृष्ट होते.

२. शून्याशी निगडित लहरींना आकर्षित आणि प्रक्षेपित करणे

आकाशकंदिलाच्या विलक्षणात्मक आकारस्वरूपात शून्याशी निगडित लहरींना आकृष्ट करून त्यांना संचारणता प्रदान करून वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता असते.

३. शून्यात्मक पोकळीची आणि त्यातून कार्यदर्शकतेची निर्मिती होणे

आकाशकंदिलाच्या आकारकक्षेत सूक्ष्म शून्यात्मक पोकळीची निर्मिती होते आणि ती पोकळी दृश्य बंधनातून साकार होऊन कार्यदर्शकतेच्या अवस्थेत संचारते आणि सर्व दिशांना चक्राकार लहरींचे प्रक्षेपण होते. त्यामुळे वातावरण चैतन्यमय होते आणि कुटुंबातील लोकांना त्याचा लाभ होतो.

४. इच्छा, क्रिया आणि ज्ञान यांची सूक्ष्म-वलये निर्माण होणे

आकाशकंदिलाजवळ इच्छा, क्रिया आणि ज्ञान या ईश्वराच्या शक्तीस्वरूपाचे दर्शक असणारी सूक्ष्म वलये निर्माण होतात. ही वलये वातावरणावर आवश्यक असा परिणाम करणारी असतात. ती ईश्वराची दर्शक असल्यामुळे समष्टीला पोषक असतात.

५. चैतन्याने भारीत समान वलयांचे प्रक्षेपण होणे

आकाशकंदिलाच्या दोन्ही सपाट भागांतून सम प्रमाणात वलयांकित होत जाणार्‍या चैतन्याने भारीत वलयांचे प्रक्षेपण होते. हे प्रक्षेपण म्हणजे सात्त्विकतेचा आविष्कार असतो. साधना परिणामकारकपणे व्हायला त्यांचा लाभ होतो.

 

सात्त्विक आकाशकंदिलाची वैशिष्ट्ये

१. प्रत्येक जिवाच्या जीवनात स्थूलातून आणि सूक्ष्मातून येणारे अडथळे दूर करून त्याची उन्नती करून घेण्यासाठी ‘हिंदु जनजागृती समिती निर्मित सात्त्विक आकाशकंदिल’ हे देवाने एक माध्यम म्हणून निर्माण केले आहे.
२. जिवातील रज-तम गुण नष्ट करून सत्त्वगुण वाढविणारे ईश्वरी कृपेचे स्थूल माध्यम म्हणजे ‘हिंदु जनजागृती समिती निर्मित सात्त्विक आकाशकंदिल’ होय.

 

सात्त्विक आकाशकंदिलामुळे होणारे लाभ

१. कनिष्ठ देवतांच्या लहरी आकर्षित झाल्यानेही घराची शुद्धी होणे

आकाशकंदिल घरी ठेवल्यावर घराची ०.२५ टक्के शुद्धी होते. आकाशकंदिल घरात ठेवल्यावर त्यात वायूमंडलात संचारत असलेल्या कनिष्ठ देवतांच्या लहरींचे आकर्षण होऊन वास्तूची काही प्रमाणात शुद्धी होते.

२. वातावरणातील ईश्वराच्या चक्राकार लहरी एकत्रित होऊन त्यांचे घरावर सूक्ष्म संरक्षककवच तयार होणे

आकाशकंदिल घराच्या बाहेरच्या बाजूस लावल्यास वातावरणात प्रक्षेपित होत असलेल्या ईश्वराच्या चक्राकार लहरींचे एकत्रिकरण होऊन त्यांचे घरावर कवचाच्या स्वरूपात प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे घरावर सूक्ष्म स्वरूपात संरक्षककवच निर्माण होते.

३. दिवसा ईश्वरी चैतन्य ग्रहण करून रात्री त्याचे प्रक्षेपण करणे

दिवसा आकाशकंदिल ईश्वरी चैतन्य ग्रहण करून रात्री त्याचे प्रक्षेपण करतो. दिवसा केले जाणारे प्रक्षेपण हे ब्राह्मतेजाने भारीत असते, तर रात्री प्रक्षेपित करत असलेले तत्त्व हे क्षात्रतेजाने भारीत असते.

४. आकाशकंदिलातून सतत ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी भारीत विचारांचे समाजात प्रक्षेपण होणे

आकाशकंदिलावर लिहिलेला मजकूर शब्दब्रह्मस्वरूपाचा असल्यामुळे ऊर्जेचे वलय निर्माण होऊन त्या माध्यमातून सतत ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी भारीत विचारांचे समाजात प्रक्षेपण होत रहाते.

५. शेजारच्या घराचीही शुद्धी होणे

घरात आकाशकंदिल लावल्यावर वायुमंडलात संचारत असलेल्या कनिष्ठ देवतांच्या लहरी त्याकडे आकर्षित होऊन त्या लहरींचा मोठा साठा निर्माण होतो. त्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे शेजारच्या घराचीही काही प्रमाणात शुद्धी होते.

६. आकाशकंदिलाच्या पोकळीतील ईश्वरी तत्त्वाचा बिंदू बनणे आणि त्यातून चैतन्याचे प्रक्षेपण होणे

आकाशकंदिलाच्या पोकळीतून ईश्वरी तत्त्व ग्रहण होऊन त्याचे बिंदू बनतात. त्यांतून चैतन्यमय लहरींचे प्रक्षेपण परत त्याच बिंदूंकडे होते आणि या माध्यमातून पूर्णत्व स्वरूपात चैतन्याचे प्रक्षेपण होते.

एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १५.१०.२०० , सायं. ६.५९)

 

हा आकाशकंदिल म्हणजे सात्त्विकता आणि चैतन्य पसरवणारे यंत्र !

हिंदु जनजागृती समिती निर्मित सात्त्विक आकाशकंदिल दैनंदिन वापरात आणून त्याच्यातील सात्त्विकतेचा लाभ घ्या. रात्री झोपतांना खोलीत आकाशकंदिल लावल्यास पुढील लाभ होतात.

१. घरातीलत्रासदायक शक्ती आपोआप अल्प होऊ शकते. घरातील व्यक्तींना वाईट शक्तींचा त्रास असल्यास तो दूर होऊ शकतो.

२. घरातील व्यक्तींना आकाशकंदिलातून मुबलक प्रमाणात सात्त्विकता मिळेल. त्यामुळे त्यांची साधना चालू राहील आणि त्यांची वाईट शक्तींशी लढण्याची कुवत वाढेल.

३. घरातील सत्त्वगुणांचे प्राबल्य वाढेल. त्यामुळे वास्तू आपोआपच शुद्ध आणि सात्त्विक होईल.

 

आकाशकंदिलाचा संदेश

मी जसा सातत्याने उत्साह आणि चैतन्य यांनी माझ्या सेवेत तत्पर राहून सेवा परिपूर्ण करतो, त्याचप्रकारे तुम्हीही झोकून देऊन स्वभावदोषविरहीत आणि भावभक्तीने सेवा करा. मला जशी ईश्वरी छाया प्राप्त झाली आहे, तशी तुम्हीही प्राप्त करा. याच जन्मात ध्येयप्राप्ती (ईश्वरप्राप्ती) व्हावी, यासाठी तुम्हाला सद्गुरु मिळाले आहेत. या जन्मात ध्येयप्राप्ती न झाल्यास ती पुढील जन्मात होणार कि नाही, ते अज्ञात असल्याने आलेल्या संधीचा लाभ करून घ्या आणि जीवनाचे कल्याण करा. – सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून

 

दिवाळीविषयीचे लघुपट पहा !