भोजनाच्या संदर्भातील आचार : आहार कसा असावा

१. आहार कसा असावा आणि कसा नसावा?

१. मांसाहार तसेच तमोगुणी आहार टाळा !

अती तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे पदार्थ अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पिझ्झा, चिप्स, वेफर्स यांसारखे ‘फास्ट फूड’ खाऊ नका.

२. शाकाहार, तसेच सात्त्विक आहार घ्या !

दूध, लोणी, गायीचे तूप, ताक, तांदूळ, गहू, डाळी, पालेभाज्या, फळे यांसारखे किंवा यांपासून बनवलेले सात्त्विक अन्नपदार्थ सेवन करा.

३. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी मिताहार करा !

जेवतांना पोटाचे दोन भाग अन्न सेवन करा. तिसरा भाग पाण्यासाठी आणि चौथा भाग वायूसाठी रिकामा ठेवा.

 

२. जेवणाचे ताट कसे वाढावे ?

 

३. भोजनाची योग्य पद्धत

१. पाट किंवा आसन घेऊन त्यावर भोजनासाठी बसा. आसंदी-पटलावर (‘टेबल-खुर्ची’) किंवा नुसत्या भूमीवर भोजनाला बसणे टाळा.

२. शक्यतो सर्व कुटुंबियांनी स्वयंपाकघरात किंवा भोजनगृहात एकत्र भोजनाला बसावे. दक्षिणेकडे तोंड करून भोजनास बसणे टाळा.

३. वाढलेले भोजन प्रथम देवाला अर्पण करा आणि नंतर देवाचा प्रसाद म्हणून ते नामजप करत सेवन करा.

४. कोणाचे उष्टे अन्न खाऊ नका; कारण त्यामुळे वाईट शक्‍तींचा त्रास होऊ शकतो.

५. ताटात अन्नपदार्थ टाकू नका. जेवण झाल्यावर ताटाभोवताली पडलेले अन्नकण पायदळी येऊ नयेत; म्हणून लगेच उचला.

६. ‘अन्नदाता सुखी भव ।’, असे म्हणून आणि उपास्यदेवतेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून पाटावरून उठा.

 

४. चमच्याने जेवणे आणि हाताने जेवणे यांतील भेद !

‘सजीव व्यक्तीमध्ये निर्जीव वस्तूंपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य असते. चमचा धातूचा असल्याने, तसेच तो निर्जीव असल्यामुळे त्याच्यामध्ये सात्त्विकता आणि चैतन्य अल्प प्रमाणात आहे. या उलट मनुष्यप्राण्याची किमान सात्त्विकता २० टक्के असते. त्याच्या पाचही बोटांतून पंचतत्त्वांशी संबंधित शक्ती प्रवाहित होत असते. जेव्हा व्यक्ती हाताने जेवते, तेव्हा तिच्या हाताच्या पाचही बोटांतून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता तिच्या हातातील ग्रासाकडे (घासामध्ये) प्रवाहित होते आणि तिने अन्न ग्रहण केल्यावर ही सात्त्विकता पुन्हा तिच्या देहात जाते. अशा प्रकारे शक्तीपातयोगानुसार व्यक्तीकडून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता आणि शक्ती तिला पुन्हा मिळते. या उलट चमच्याचा वापर केल्याने व्यक्तीच्या पाचही बोटांतून प्रवाहित होणारी शक्ती अंगठा आणि तर्जनी यांच्या माध्यमातून चमच्यामध्ये प्रविष्ट होऊन चमच्यातील रज-तम न्यून करण्यासाठी व्यय होते. त्यामुळे तिला स्वत:ची सात्त्विकता ग्रहण करता येत नाही. या उलट चमच्यातील रज-तमात्मक स्पंदने चमच्यातील अन्नकणांमध्ये जातात आणि तिला अन्नातून रज-तमात्मक शक्ती मिळते. त्यामुळे तिला चमच्याने खाल्यामुळे आध्यात्मिक स्तरावर लाभ न होता उलट तिची हानीच होते. त्यामुळे व्यक्तीने चमच्याने अन्न ग्रहण करण्यापेक्षा हाताने ग्रहण करणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक योग्य आहे.  असे जरी असले, तरी त्वचा रोग, हाताच्या बोटांना इजा झालेली असेल किंवा सूप, खीर यांसारखे पातळ पदार्थ ग्रहण करत असतांना व्यक्तीने हातापेक्षा चमच्याने अन्न ग्रहण करणे अधिक योग्य आहे. वरील अपवादात्मक परिस्थिती वगळता, व्यक्तीने हाताने अन्न ग्रहण करणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी आहे.’

टीप – ६१ टक्के पातळीनंतर बाह्य गोष्टींचा देहाच्या सात्त्विकतेवर अल्प प्रमाणात परिणाम झाल्याने ६१ टक्के पातळीनंतर चमच्याने अन्न ग्रहण करण्याचा परिणाम न्यून होऊ लागतो. ७१ ते ८० टक्के पातळीपर्यंत चमच्याने अन्न ग्रहण केल्याचा परिणाम केवळ १ टक्का इतकाच होतो आणि ८१ टक्के पातळीनंतर हा परिणाम ० टक्के इतका म्हणजे अजिबात होत नाही.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२० रात्री ११.०५)

 

५. जेवल्यानंतर वामकुक्षी करणे

वामकुक्षी करणे

वामकुक्षी करणे

दुपारी जेवल्यानंतर २४ मिनिटे डाव्या कुशीवर झोपणे, म्हणजे वामकुक्षी करणे होय.

अ. शास्त्र

जेवल्यानंतर अन्नपचन नीट व्हावे यासाठी रक्‍ताचा जास्त पुरवठा पोटाच्या आतड्यांकडे होत असल्याने या काळात मेंदूला रक्‍तपुरवठा अल्प प्रमाणात होतो आणि मेंदूच्या कार्यात थोडी शिथिलता येते. म्हणून या काळात अगदी थोडा वेळच विश्रांती किंवा झोप घ्यावी.

Leave a Comment