पंढरपूर येथे शिवरात्रीनिमित्त सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास उत्तम प्रतिसाद

अकलूज येथील प्रदर्शन कक्षावर श्री. धवलसिंह मोहिते पाटील ग्रंथ पहाताना

पंढरपूर – येथील श्री संत तनपुरे महाराज मठात महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या कक्षासाठी ह.भ.प. बद्रीनाथ तनपुरे महाराज यांनी जागा उपलब्ध करून दिली. छतासाठी वासे आणि बांबू श्री. नाना निकते यांनी विनामूल्य उपलब्ध केले.

विशेष

१. श्री संत तनपुरे महाराज मठाचे सुरक्षारक्षकही दर्शनाला येणार्‍या भाविकांना सनातनच्या उत्पादनांचे महत्त्व सांगत होते.

२. बालसाधक कु. श्‍लोक पाटील आणि कु. संस्कृती पाटील यांनी दैनिक सनातन प्रभातच्या विशेषांक आणि लघुग्रंथाचे वितरण केले.

परळी वैजनाथ (जिल्हा बीड) – येथे महाशिवरात्री निमित्त सनातन संस्थेच्या वतीने भव्य ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला अनेक भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. परळी येथे मागील १५ वर्षांपासून नियमित प्रदर्शन लावले जाते. या प्रदर्शनाच्या सेवेमध्ये धर्मप्रेमी सर्वश्री आकाश चौरे, अशोक गुरव, संदेश काळे, सोमनाथ आपटे हेही सहभागी झाले होते.

बारामती (जिल्हा पुणे) – येथे सिद्धेश्‍वर गल्ली येथील सिद्धेश्‍वर मंदिर येथे ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी एक मुसलमान महिलेने कक्षावर येऊन ‘संचित प्रारब्ध’ हा ग्रंथ आणि दैनिक सनातन प्रभात शिवरात्री विशेषांक घेतला.

अकलूज (जिल्हा सोलापूर) –  येथे पर्वती मंदिर, वेळापूर (जिल्हा सोलापूर) येथे अर्धनारी नटेश्‍वर मंदिर, इंदापूर (जल्हा पुणे) येथील महादेव मंदिर, म्हसवड (जिल्हा सातारा) येथे श्री सिद्धनाथ मंदिर येथे प्रदर्शन लावण्यात आले होते.

विशेष

१. अकलूज येथील प्रदर्शन कक्षावर श्री. धवलसिंह मोहिते पाटील यांनी सहकुटुंब कक्षाला भेट दिली, तसेच रामनवमीला श्रीराममंदिरात प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली.

२. इंदापूर येथील शिरसोडी भागात ‘महाशिवरात्र’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. मंदिराती पुजार्‍यांनी माईक व्यवस्था जोडून दिली, प्रवचनानंतर नामजपही चालू ठेवला.

३. वेळापूर येथील प्रदर्शनावर इयत्ता १२ वी कक्षेत शिकणार्‍या विद्यार्थ्याने ५५० रुपयांचे ग्रंथ खरेदी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment