सोलापूर येथे महाराष्ट्र राज्यातील ग्रंथपालांच्या राज्यअधिवेशनात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर येथे ग्रंथप्रदर्शन पहातांना जिज्ञासू

सोलापूर – येथे १७ फेब्रुवारी या दिवशी हुतात्मा स्मृती मंदिर येथे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ग्रंथपालांचे एकदिवसीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला विविध जिल्ह्यांतून आलेल्या ग्रंथपालांनी भेट देऊन सनातनच्या ग्रंथांविषयी गौरवौद्गार काढले आणि ‘‘असे ग्रंथ प्रत्येक वाचनालयाने घेऊन वाचकांसाठी ठेवावेत’’, असे मत अनेक ग्रंथपालांनी व्यक्त केले.

क्षणचित्रे

१. ‘सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ हे राष्ट्र आणि धर्म याविषयी मार्गदर्शन करतात ते समाजात सर्वत्र पोहोचणे आवश्यक आहे’, असे मत प्रदर्शनास भेट दिलेल्या ग्रंथपालांनी या वेळी व्यक्त केले.

२. काही ग्रंथपालांनी साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्याची इच्छा व्यक्त केली.

३. दोन वाचनालयाच्या प्रमुखांनी प्रत्येकी ५ सहस्र अशी एकूण १० सहस्र रुपयांच्या ग्रंथांची मागणी केली.