वापी (गुजरात) येथे सनातनच्या गुजराती संकेतस्थळाचे पू. इंद्रवदन शुक्ल यांच्या हस्ते उद्घाटन

गुजराती संकेतस्थळाचे उद्घाटन करतांना पू. इंद्रवदन शुक्ल

वापी (गुजरात) : येथील संत पू. इंद्रवदन शुक्ल यांच्या शुभहस्ते २४ सप्टेंबर या दिवशी सनातन संस्थेच्या गुजराती संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या मंगलप्रसंगी सनातनचे साधक उपस्थित होते. यानिमित्त पू. शुक्ल यांनी नूतन संकेतस्थळाला आशीर्वाद दिले.

पू. इंद्रवदन शुक्ल यांचे आशीर्वचन

या संकेतस्थळाद्वारे जगातील संपूर्ण गुजराती समाजाला लाभ होईल आणि ते अध्यात्माकडे वळतील !

सनातन संस्थेच्या गुजराती संकेतस्थळाद्वारे जगातील संपूर्ण गुजराती समाजाला लाभ होईल आणि ते अध्यात्माकडे वळतील. या संकेतस्थळाच्या माध्यमातून हिंदु धर्माची महानता आणि अध्यात्मशास्त्र यांविषयीची माहिती सर्वांना मिळेल. सनातन धर्माच्या प्रचारासाठी सनातन संस्था जे काही कार्य करत आहे, त्याने मला अतिशय आनंद होत आहे. मी खात्री देतो की, एक दिवस असा येईल, ज्या दिवशी आपण हिंदु राष्ट्रात रहात (नांदत) असू. डॉ. आठवलेजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांना माझे खूप खूप आशीर्वाद आणि शुभ सदिच्छा !

सनातन संस्थेच्या गुजराती संकेतस्थळाची मार्गिका

https://www.sanatan.org/gujarati/

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment