हिंदुत्ववाद्यांचा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असलेला कृतज्ञताभाव

अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी.

अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी.

षष्ठ अखिल भारतीय हिंदु अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की, गेल्या ३ वर्षांपासून मी हिन्दु जनजागृती समितीच्या संपर्कात आहे. त्यापूर्वी गेली २५ वर्षे मी ‘कम्युनिस्ट’ पक्षात होतो. सध्या जेव्हा कम्युनिस्टांमध्ये अंतर्गत चर्चा होते, त्या वेळी त्यांच्या अनेक चर्चांमध्ये माझे नाव येते आणि ‘एक दिवस तुमची हत्या केली जाईल’, असेही सांगतात. असे असतांनाही मी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने आणि हिन्दु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाखाली धर्माचरण करतो. त्यामुळे मी साम्यवाद्यांच्या धमक्यांना खंबीरपणे सामोरे जात आहे.

डॉ. नील माधव दास, संस्थापक अध्यक्ष, तरुण हिन्दू, झारखंड.

डॉ. नील माधव दास

उद्बोधन सत्रामध्ये डॉ. नील माधव दास यांनी मार्गदर्शनाला प्रारंभ करतांना ‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी नमस्कार करून मार्गदर्शनाला आरंभ करतो’, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन केले.

अधिवक्ता श्री. रवींद्र घोष

अधिवक्ता श्री. रवींद्र घोष

बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंसाठी आम्ही कार्य करत असून त्यासाठी हिंदु जनजागृती समिती पाठिंबा अन् प्रेरणा देत असून त्यांच्या सदिच्छा आमच्या सदैव पाठीशी आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेही आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत.

श्री. नितीन सोनपल्ली

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीमुळे धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळाली !

प्रथम अधिवेशनाला आलो, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाल्यावर धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळाली. आश्रमात नियोजन, शिस्त पहायला मिळाले. आश्रमात येऊन शांत वाटले. जेव्हा कधी निराश होतो, तेव्हा गुरुदेवांचे शब्द आठवतात, श्रीकृष्णच कार्य करवून घेत आहे. देव याचे फळ नक्की देईल. प्रत्येक वर्षी आमचे काही कार्यकर्त्यांना हिंदू अधिवेशनासाठी पाठवतो. अधिवेशनाला येऊन त्यांच्यात परिवर्तन होते. कार्यकर्त्यांना अध्यात्माची ओळख होते. येथे येऊन साधनेने विचारक्षमता वाढते. त्यामुळे कार्याला यश मिळते. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे अनेक धन्यवाद ! – नितीन सोनपल्ली, मध्यप्रदेश

अधिवक्ता निरंजन चौधरी

मला गोहत्या आणि लव्ह जिहाद यांविरोधात कार्य करण्याची संधी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांनी कोणतीही पात्रता नसतांना दिली आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना केवळ धर्मकार्य करायचे आहे.

श्री. उमेश शर्मा, श्री क्षेत्र महासंस्थान

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात भोलेनाथ, राम आणि कृष्ण यांचा अपूर्व संगम ! – उमेश शर्मा

१६ जूनला अखिल भारतीय अधिवेशनातील सायंकाळच्या सत्रात श्री. उमेश शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, परात्पर गुरु डॉक्टरांची भेट होण्यापूर्वी मला अंतरातून वाटत होते की, ते एक महान शांतीस्वरूप, चैतन्यस्वरूप, शक्तीस्वरूप, ईश्‍वरस्वरूप आहेत. त्यांच्या भेटीसाठी आतुर झालो होतो. १५ जूनला त्यांना प्रथमच पहाता, ते राम आणि कृष्ण यांच्यासम लोककल्याणकारी अवतारी महापुरुष असल्याची अनुभूती मला आली. त्यांच्या डोळ्यांत अहिंसास्वरूप, प्रेमस्वरूप, धर्मस्वरूप, सत्यस्वरूप अनुभवता आले. त्यांच्यामध्ये भोलेनाथ, राम आणि कृष्ण यांचा अपूर्व संगम झाला असून तेच परमेश्‍वरस्वरूप आहेत. त्यामुळेच परात्पर गुरु डॉक्टरांनी ब्रह्मयज्ञ आणि क्षात्रयज्ञ आरंभला आहे. त्यांच्या अद्भूत ज्ञानशक्तीद्वारे हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. आपण मात्र हिंदु राष्ट्रासाठी धैर्याने प्रयत्नरत राहिले पाहिजे. लक्षात घ्या, धैर्य आहे, तेथेच अमृतत्व आहे. परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा आणि भाव ठेवा. त्यांचे आज्ञापालन करा. साधना करत रहा. क्षणोक्षणी हृदयात गुरुतत्त्व साठवून राष्ट्रकार्यार्थ समर्पित व्हा ! आपल्या सर्वांना प्रेम, शांती आणि स्वर्गानुभूती देणारे हिंदु राष्ट्र मिळावे, याकरता परात्पर गुरु डॉक्टररूपी भगवंतच आपल्यासाठी कार्यरत आहे.

Leave a Comment