सनातन पंचांग, संस्कार वही आणि सनातनची सात्त्विक उत्पादने

अ. सनातन पंचांग

समाजाला धर्मशिक्षण मिळावे, समाज साधना करायला लागावा, समाजात धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयी जागृती व्हावी आदी उद्देश समोर ठेवून परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २००६ पासून वार्षिक सनातन पंचांग सिद्ध करण्यास आरंभ केला. सध्या(वर्ष २०१७) मराठी(३ आवृत्त्या), हिंदी, कन्नड(२ आवृत्त्या), गुजराती, इंग्रजी, तेलुगु, तमिळ आणि ओडिया या ८ भाषांत काशित होणारे हे पंचांग साधारणपणे १० लाख ग्राहकांपर्यंत पोचते. या पंचांगाचे ८ भाषांतील अ‍ॅन्ड्रॉइडसाठीचे अ‍ॅप्लीकेशनही वर्ष २०१३ पासून विनामूल्य प्रकाशित केले जात आहे.  प्रतिवर्षी १० लाखांहून अधिक वाचक त्याचा लाभ घेत आहेत.

आ. संस्कार वही

परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष २००६ पासून संस्कार वहीची निर्मिती केली जाते. या वहीमध्ये विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणारे, त्यांना हिंदु संस्कृतीचे पालन करण्यास शिकवून त्यांचा धर्माभिमान जागवणारे, धर्मशिक्षण देणारे आणि राष्ट्रेम वाढवणारे लिखाण असते. केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच उपयुक्त असलेल्या या वह्या ४ प्रकारांत उपलब्ध आहेत.

इ. सनातनची सात्त्विक उत्पादने

समाजाला सात्त्विकता वाढवण्यासाठी एक सोपे माध्यम लाभावे, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष २००३ पासून सात्त्विक उत्पादनांच्या निर्मितीला आरंभ झाला.

इ १. महत्त्व

सनातनची उत्पादने सात्त्विक असल्यामुळे ती वापरल्याने सात्त्विकता ग्रहण होण्यासह आध्यात्मिक उपाय होण्यासही साहाय्य होते. उत्पादने स्वदेशी असल्याने ती वापरल्यामुळे स्वदेशी व्रताचे अंगिकारण होते. आयुर्वेदिक उत्पादने वापरल्यामुळे एकप्रकारे हिंदु संस्कृतीचे जतनही होते.

इ २. नित्योपयोगी आयुर्वेदीय उत्पादने

दंतमंजन, उटणे, स्नानाचा साबण(७ कारांत), शिकेकाई(पूड) आणि त्रिफळा चूर्ण.

इ ३. पूजोपयोगी आणि अन्य उत्पादने

गोमूत्र-अर्क, कुंकू, अष्टगंध, अत्तर(४ सुगंधांत), उदबत्ती(७ सुगंधांत), कापूर, जपमाळ, नामजप-यंत्र, देवतांची चित्रे आणि नामजप-पट्ट्या. (सनातन पंचांग, सात्त्विक उत्पादने आदींविषयी अधिक माहिती सांगणारी पुस्तिका सनातनच्या स्थानिक वितरकांकडे उपलब्ध असते.)

2 thoughts on “सनातन पंचांग, संस्कार वही आणि सनातनची सात्त्विक उत्पादने”

    • नमस्कार,

      कृपया आपल्या घराजवळ सनातनची उत्पादने कुठे मिळू शकतात, हे जाणून घेण्यासाठी 9322315317 या क्रमांकावर संपर्क करावा.

      Reply

Leave a Comment