सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात विविध ठिकाणी उमटलेले ‘ॐ’ अस्पष्ट होण्यामागील कार्यकारणभाव

रामनाथी आश्रमातील लाद्यांवर उमटलेले अनेक ‘ॐ’ ऑगस्ट २०१३ पासून अस्पष्ट होत गेले. २१.४.२०१४ या दिवशी दोन ठिकाणी ‘ॐ’ दिसले.

 

१. उत्पत्ती, स्थिती आणि लय, हा
नियम रामनाथी आश्रमात उमटलेल्या ‘ॐ’ला लागू होणे

‘तेजतत्त्वाच्या स्तरावर साकारणार्‍या दैवी चिन्हांचे कार्य तेजतत्त्वाच्या स्तरावर पूर्ण झाल्यानंतर त्यांचे तेजाच्या स्तरावरचे प्रगटीकरण थांबून ते अदृश्य होतात. येथे उत्पत्ती, स्थिती आणि लय हा नियम विशिष्ट तत्त्वाच्या स्तरावर प्रगटीकरण होणारे दैवी पालट किंवा दैवी चिन्ह यांना लागू पडतो. त्यामुळे आश्रमात भूमीवर उमटलेले अनेक ‘ॐ’ ऑगस्ट २०१३ पासून अस्पष्ट होत गेले आहेत.

 

२. तेजापेक्षा वायुतत्त्वाचे प्रमाण
वाढल्याने शुभचिन्हांचा आकार अस्पष्ट होणे

शुभचिन्हांमध्ये कार्यरत असणार्‍या पंचतत्त्वांपैकी तेजतत्त्वाचे प्रमाण न्यून होऊन वायूतत्त्वाचे प्रमाण वाढल्यावर शुभचिन्हाचे तेजाशी संबंधित असणारे रूप तेजतत्त्वाच्या अभावामुळे अस्पष्ट होते आणि वायुतत्त्व वृद्धींगत झाल्यामुळे सूक्ष्म-स्पर्शाची जाणीव अनुभूतीच्या स्तरावर अधिक प्रबळ होऊ लागते. तेजापेक्षा वायुतत्त्वाचे प्रमाण वाढल्याने शुभचिन्हांचा आकार अस्पष्ट झाला.

 

३. ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’ या न्यायानुसार आश्रमात उमटलेल्या ‘ॐ’च्या
शुभचिन्हांचे कार्य सूक्ष्मातून चालू झाल्याने ते स्थुलातून अस्पष्ट दिसणे

स्थुलातून चिन्ह उमटल्यामुळे स्थुलातून चिन्हाचे दर्शन होऊन स्थुलातून आध्यात्मिक उपायांचा लाभ होत असे. आता स्थुलातून उपाय करण्यापेक्षा सूक्ष्मातून आध्यात्मिक उपाय करण्याला प्राधान्य प्राप्त झालेले आहे, तसेच स्थुलातून सगुण स्तरावर तेजाच्या बळावर रूपाच्या साहाय्याने कार्य करण्याची आवश्यकता पूर्ण झालेली आहे. ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’ या न्यायानुसार ‘ॐ’च्या शुभचिन्हांचे कार्य स्थुलाऐवजी सूक्ष्मातून चालू झाल्यामुळे त्यांचा स्थुलातून दिसणारा आकार अस्पष्ट झालेला आहे.

 

४. शुभचिन्हातील चैतन्य स्थळाच्या सगुण स्तरावर कार्यरत न
रहाता काळाच्या निर्गुण स्तरावर कार्यरत झाल्यामुळे आकार अस्पष्ट होणे

जेव्हा शुभचिन्ह स्थळाच्या पातळीला कार्यरत असते, तेव्हा ते ठळक आणि सुस्पष्ट असते. जेव्हा शुभचिन्हांतील चैतन्य काळाच्या स्तरावर कार्यरत होऊ लागते, तेव्हा त्याची सुस्पष्टता न्यून होऊ लागते. यालाच ‘शुभचिन्हामध्ये कार्यानुमेय सगुण तत्त्वाचा लोप होऊन निर्गुण तत्त्व प्रबळ झाले’, असे म्हणतात.

 

५. शुभचिन्हांतील रूपस्वरूपी तेजाचा
लोप होऊन अस्तित्वजन्य महातेजाचे कार्य चालू होणे

तेजाचे कार्य सगुण रूपाच्या पातळीला चालू असते; परंतु महातेजाचे कार्य अस्तित्वाच्या पातळीला चालू असते. काळानुसार शुभचिन्हांतील तेज संपुष्टात येऊन त्यामध्ये सुप्त अवस्थेत असणारे महातेज कार्यरत झाल्यामुळे अस्तित्वजन्य कार्य आरंभून आधी ठळक आणि स्पष्ट दिसणारी शुभचिन्हे नंतर अस्पष्ट दिसू लागतात.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.११.२०१६, रात्री ८.४३)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment