हिंदु राष्ट्रातील धर्मध्वज

ध्वजाला प्रार्थना

flag_new_m(1)यज्ञध्वज नमस्तुभ्यं धर्मध्वज नमोऽस्तु ते ।
तालध्वज नमस्तेऽस्तु नमस्ते गरुडध्वज ॥

वामनपुराण, अध्याय ८७, श्‍लोक ४

अर्थ : हे यज्ञध्वजा, हे धर्मध्वजा तुला नमस्कार असो. हे तालध्वजा, हे गरुडध्वजा, तुला नमस्कार असो.

विश्‍वकल्याणासाठी सात्त्विक लोकांनी चालवलेले भावी हिंदु राष्ट्र धर्माधिष्ठित असेल. त्यामुळे हिंदु राष्ट्रात राष्ट्रध्वज नाही, तर धर्मध्वज असेल. याचे कारण म्हणजे राष्ट्रध्वजापेक्षा धर्मध्वज महत्त्वाचा. हिंदु राष्ट्र धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष साध्य करणे, या तत्त्वावर आधारलेले असेल. त्यासाठी धर्मध्वज प्रेरणा देईल. याउलट राष्ट्रध्वजामुळे केवळ राष्ट्राभिमान जागृत होऊ शकतो. धर्मध्वज धर्माधिष्ठित राज्याची प्रेरणा देत असल्याने धर्मध्वजाला प्रार्थना करतात; पण राष्ट्रध्वजाला कोणी प्रार्थना करत नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्रात धर्मध्वज हाच राष्ट्रध्वज असेल. या लेखात धर्मध्वजाची माहिती दिली आहे. त्यामुळे आपल्या धर्मध्वजाप्रती भाव निर्माण होईल.

 

ध्वजाचे प्रकार – पताका आणि धर्मध्वज

हिंदु धर्मात ध्वजाचे दोन प्रकार पहावयास मिळतात. शास्त्रानुसार एका टोकाच्या ध्वजाला पताका म्हणतात. ते विजयाचे प्रतीक असते. युद्धकाळात त्याचा वापर होतो. युद्धाच्या रथावर एका टोकाचा ध्वज लावला जातो. एक टोकाच्या भगव्या ध्वजाकडे पाहून शक्ती जाणवते.

दोन टोकांच्या ध्वजाला धर्मध्वज संबोधले जाते. हा ध्वज हिंदु धर्माचे प्रतीक म्हणून धार्मिक उत्सवांत मंदिरांवर लावला जातो. दोन टोकांच्या भगव्या ध्वजाकडे पाहून भाव आणि आनंद जाणवतो. म्हणूनच हिंदु राष्ट्राचा धर्मध्वज म्हणून दोन टोकांचा ध्वज सुयोग्य आहे.

 

 सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती
यांच्या कार्यानुसार ध्वज निरनिराळा घेणे

सर्वसाधारणतः सनातन संस्था धर्मजागृती आणि धर्मप्रसार करत असल्यामुळे संस्थेच्या संदर्भात दोन टोकांचा ध्वज घ्यावा. हिंदु जनजागृती समिती धर्मरक्षणाचे कार्य करते. धर्मरक्षणार्थ राबवण्यात येणार्‍या मोहिमा विजयाशी संबंधित असल्यामुळे समितीच्या संदर्भात एका टोकाचा ध्वज घ्यावा.

 

आपला राष्ट्रध्वज कोणता संदेश देतो ?

प्रत्येक राष्ट्राचे मानचिन्ह म्हणजे त्या राष्ट्राचा राष्ट्रध्वज ! हा राष्ट्रध्वज त्या देशाच्या लोकांना काहीतरी संदेश देत असतो. आपला अशोक चक्रांकित तिरंगा भारतियांना कोणता संदेश देत आहे ?, ते पाहूया.

१. हिरवा रंग : समृद्धी

२. पांढरा रंग : पांढरा रंग हा क्षमा आणि शांती यांचा संदेश देतो.

३. केशरी रंग : त्याच्या माथ्यावरचा केशरी रंग हा त्याग आणि सेवाधर्म यांचा संदेश देणारा आहे; मात्र या केशरी रंगात दडलेला लाल रंग हा जागरुकता असण्याची जाणीव जागृत ठेवतो. प्रेम-सत्य-अहिंसा-सेवा-क्षमा हा आपला माणूसधर्म असला, तरीही अन्यायांविरुद्ध लढण्याचे तुझे सामर्थ्य तू गमावू नकोस. तुझ्या मनगटातील सिंहाचे बळ जपून ठेव, अशी ताकीद या केशरी रंगात दडलेला लाल रंग आपल्याला देत असतो.

४. अशोकचक्र : मोठ्या डौलात फडकणार्‍या ध्वजावर निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. निळा रंग हा आकाशाचा, म्हणजे या विश्‍वाच्या पोकळीचा रंग आहे. हा रंग सर्वांभूती समभाव शिकवतो. तुमचे जीवन गतीशील ठेवा. थांबला तो संपला, पुढे चला, असा संदेश हे अशोकचक्र देत आहे. अशा आपल्या उच्च तत्त्वांचा हा संदेश जगभर घेऊन जाणारा राजा अशोक हा जगज्जेता होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात