सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांनी गायलेली भावगीते आध्यात्मिक उपायांसाठी उपयुक्त !

सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव (पू. जाधवकाका) यांना लहानपणापासूनच गायनाची आवड आहे. ते बालवयापासून भावगीते वगैरे गात असत. साधनेत आल्यावर ईश्वराप्रती वृद्धिंगत झालेल्या भावामुळे त्यांच्या आवाजात होत गेलेला पालट, त्या गायनाचा समष्टीवर होणारा परिणाम, संतांच्या वाणीतील चैतन्यामुळे ती आध्यात्मिक उपायकरण्यात उपयुक्त कशी आहेत आणि पर्यायाने साधनेचे महत्त्व यांविषयी आपण प्रस्तूत लेखातून जाणून घेऊया. ही गीते ऐकण्याची सोयही लेखात केलेली आहे.

पू. जाधव काकांचे मनोगत

१. पू. जाधवकाका लहानपणापासून विविध प्रकारची गाणी गाणे,
त्यांपैकी भावगीते गाण्यास अधिक आवडणे आणि गाणी ऐकल्यावर लोकांनी कौतुक करणे

‘लहानपणापासून मी गाणी गायचो. आमच्या घरातील सर्वच जण गाणी गात. शिक्षण घेत असतांना मी शास्त्रीय संगीत शिकण्याचा विचार केला; पण काही कारणाने ते जमले नाही. पूर्वी मी देशभक्तीपर गीते, भावगीते आणि भक्तीगीते गायचो; परंतु मला भावगीते अधिक आवडत. लोकांना माझे गाणे आवडे. ते माझे कौतुक करत.

सनातनचे संत पू. नंदकुमार जाधवकाका भावपूर्णरित्या आणि अर्थावर लक्ष केंद्रित करून गीते गातात. त्यांच्यातील चैतन्यामुळे ती गीते चैतन्यदायी होतात. त्यामुळे ती ऐकतांना ऐकणार्‍यांचा भाव जागृत होतो. पू. काका क्षात्रगीते म्हणत असतांना क्षात्रभाव, देशभक्तीपर गीते म्हणत असतांना देशाभिमान जागृत होतो आणि भक्तीसंदर्भातील गीते म्हणत असतांना भाव जागृत होतो.

पू. काकांनी म्हटलेली गीते उपायांसाठी उपयुक्त आहेत.

ही गीते खालील मार्गिकेवर (लिंकवर) उपलब्ध आहेत.

१. आनंद कंद दाता

 

२. जय जय महाराष्ट्र

 

३. कान्हा तु खोड्या करु नको

 

४. नको देवराया

 

५. या जन्मावर, या जगण्यावर

 

६. दर्शन दे रे

 

७. वंदुया निखिल ब्रम्ह अवधुता

 

८. देहा रंगी रे

 

९. ओंकार

२. पू. जाधवकाका यांच्या गाणे गाण्याच्या प्रकारात होत गेलेले पालट

अ. शिकत असतांना चित्रपटातील (सिनेमातील) गाणी; म्हणजे जे कानावर पडे, ते गायला आवडे.
आ. चाकरीत असतांना देशभक्तीपर गीते गायला आवडे.
इ. साधनेत आल्यावर भजने, तसेच ज्यांतून भाव जागृत होतो, अशी भावगीते गाणे आवडते.

३. साधनेत येण्यापूर्वी आणि साधनेत आल्यानंतर गाणे गाण्यात झालेले पालट

३ अ. गाणे गाण्याचा उद्देश
३ अ १. साधनेत येण्यापूर्वी

‘गाण्यातील अर्थ व्यक्त झाला पाहिजे’, असे वाटून मी गात असे. त्यामुळे गाण्याच्या शब्दातील अर्थ समजून घेऊन गात असे. ‘माझा भाव जागृत व्हावा’, यासाठी गाणे म्हटले जाई.

३ अ २. साधनेत आल्यानंतर

माझ्या बरोबर इतरांनाही देवाप्रती भाव वाढण्यासाठी लाभ व्हावा, यासाठी प्रयत्न असतो.

३ आ. गाणे गाण्यासाठीचे प्रयत्न
३ आ १. साधनेत येण्यापूर्वी

जसे गाणे ऐकले आहे, तसे म्हणण्याचा मी प्रयत्न करत असे.

३ आ २. साधनेत आल्यानंतर

गातांना मी स्वरांकडे लक्ष देतो. गाण्याच्या शब्दांतील भाव प्रकट होण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होतो.

३ इ. गाण्याची उंची गाठल्यावर भावाची अवस्था पेलण्याबाबत
३ इ १. साधनेत येण्यापूर्वी

गाण्याची उंची गाठल्यावर भावाची अवस्था पेलता येत नसे. मी तेथे थांबत असे.

३ इ २. साधनेत आल्यानंतर

मी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो.

३ ई. गाणे गायल्यानंतर कौतुकाची अपेक्षा
३ ई १. साधनेत येण्यापूर्वी

पूर्वी गाणे गायल्यानंतर ‘इतरांनी कौतुक करावे’, अशी अपेक्षा नसे.

३ ई २. साधनेत आल्यानंतर

कौतुकाची अपेक्षा नसते.

४. संत होण्यापूर्वी आणि संत झाल्यानंतर गाणे गाण्यात झालेले पालट

४ अ. गाणे गाण्याची प्रेरणा
४ अ १. संत होण्यापूर्वी

कोणी ‘गाणे म्हणा’ असे म्हटल्यावर मी गात असे.

४ अ २. संत झाल्यानंतर

अंतःप्रेरणेने गाणे गायले जाते. मी प.पू. भक्तराज महाराज यांची भजने अधिक वेळा गुणगुणतो. संतांच्या शब्दांतील चैतन्यामुळे ती भजने म्हणावीशी वाटतात.

४ आ. गाण्याची निवड
४ आ १. संत होण्यापूर्वी

ज्या स्वरांत गोडवा आहे, गेयता आहे, अशी गाणी मी निवडत असे.

४ आ २. संत झाल्यानंतर

कोणते गाणे गायला हवे, ते गायले जाते. तारक गीते म्हणजे ज्यातून भगवंताची कृपा होईल, अशी गीते अधिक वेळा गुणगुणली जातात.

४ इ. गाणे मनासारखे झाले नाही, तर मनाची स्थिती
४ इ १. साधनेत येण्यापूर्वी

मनाप्रमाणे गाणे झाले नाही, तर खेद वाटे.

४ इ २. साधनेत आल्यानंतर

आता खेद वाटत नाही. ‘देवाला अपेक्षित असे होणार आहे’, असे वाटते.

५. संतपद प्राप्त झाल्यानंतर

५ अ. गाणे गातांना असलेला भाव

१. ‘देवानेच आवाजाची देणगी दिली आहे. त्यामुळे तिचा देवासाठीच उपयोग करावा’, असे वाटते. कोणत्याही
प्रकारच्या गाण्यात ‘देवासाठी गाणी गाणे’, असे होते.

२. ‘देवाला स्मरून गाणे गायचे आहे. त्याची कृपा होण्यासाठी गायचे आहे’, या उद्देशाने गायले जाते.

३. गाणे गातांना प.पू. डॉक्टरांचे स्मरण होते. त्यांच्यासाठी मी गाणे गातो. ‘प.पू. डॉक्टरांना गाणे ऐकवत
आहे’, असा भाव असतो.

५ आ. गाणे गात असतांना होत असलेली प्रक्रिया

१. गाणे गातांना शब्दांनुसार संबंधित दृश्य दिसते.

२. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशासारखी गीते गातांना देशासाठी काही केलेल्यांचे स्मरण होऊन ‘आपणही
देश आणि धर्म यांसाठी काही करायला हवे’, असे वाटते.

३. ‘कन्हैया खोड्या करू नको रे ।’, अशा प्रकारच्या गाण्यातून गोपीभाव निर्माण होतो.

५ इ. गाणे गाऊन झाल्यावर मनाची अवस्था गाण्याच्या प्र्र्रकारानुसार पालटत जाणे

गाणे आनंद देणारे असेल, तर गाणे गाऊन पूर्ण झाल्यावर आनंदावस्था असते. भाव जागृत करणारे गाणे असेल, तर भाव जागृत झालेला रहातो. कधीकधी गाणे गाऊन झाल्यावर तेच शब्द गुणगुणत रहावेसे वाटतात.

५ ई. गाणे ऐकण्यापेक्षा ते गायला अधिक आवडते. दुसरे कोणी गाणे गात असतांना आपण गाणे गात असल्यासारखी एकरूपता येते.

५ उ. गाणे गातांना आलेल्या अनुभूती
५ उ १. गाणे गातांना बाह्य जगाची जाणीव काही प्रमाणात असणे

गाणे गातांना मन निर्विचार आणि आनंदी असते. बाह्य जगाची जाणीव थोडी असते; पण मुख्य लक्ष गाणे परिणामकारक होण्याकडे असते.

५ उ २. गाण्याशी एकरूपता आल्यावर ‘गाणे आत उतरते’, असे वाटते.

५ ऊ. गाणे गातांना वाईट शक्तींचे अडथळे कधीच आले नाहीत.

६. गाणे गातांनाची आणि अन्य सेवा करतांनाची अवस्था वेगळी असणे

गाणे गातांनाची अवस्था आणि अन्य सेवा करतांनाच्या अवस्था वेगळ्या असतात. ‘गाण्यातून माझ्यावर देवाची कृपा झाली पाहिजे’, असा भाव असतो. इतर सेवा करतांना समष्टी भाव असतो.

७. पूर्वीचे आणि आताचे संगीत

पूर्वी चित्रपटातील गाणी रागांवर आधारित होती. गाण्यांचे संगीत योग्य असे. ते भारतीय पद्धतीचे असे. ती गाणी गायलाही चांगली वाटत. आज पाश्चात्त्यांच्या अनुकरणामुळे भारतीय संगीत लुप्त झाले आहे. आताच्या संगीतात संगीत राहिलेले नाही. कला राहिलेलीच नाही. संगीतकलेची हानी झाली आहे.

८. गाणे गायला मिळण्याविषयीची पूर्वसूचना

फाल्गुन अमावास्या, कलियुग वर्ष ५११४ (१०.४.२०१३) या दिवशी सनातनचे संत पू. उमेश शेणै आणि पू. विनायक कर्वेमामा यांची ध्वनीचित्र तबकडी पहात होतो. त्यात त्यांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांवर नृत्य करतांना पाहिले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला की, मलाही गाणे म्हणायला सांगितले, तर ते मी म्हणीन. ‘कोणते गाणे म्हणायचे’, हेही मी ठरवले होते.

९. ६० टक्के आध्यात्मिक प्रगती गाठल्यानंतर पुढील प्रगतीसाठी
उशीर होत असतांना ‘नको देवराया अंत आता पाहू ।’ हा अभंग आर्ततेने म्हटला जाणे

६० टक्के पातळी गाठल्यानंतर ७० टक्क्यांपर्यंत जायला मला उशीर झाला. त्या वेळी मी ‘नको देवराया अंत आता पाहू ।’ हा अभंग आर्ततेने म्हणत असे. त्या वेळी कंठ दाटून येत असे. ‘तू मला हृदयात घे. तू किती दिवस मला चरणांपासून दूर ठेवणार ?’, अशी आर्तता त्या भजनातून निर्माण होत असे.

१०. संगीतकलेच्या माध्यमातून साधना करणार्‍यांसाठी पू. जाधवकाका यांनी दिलेला संदेश

संगीतकलेच्या माध्यमातून साधना करायची असेल, तर साधक-कलाकारांनी संगीतातील राग शिकून घ्यायला हवेत. रागावर आधारित गीते म्हणायला हवीत. तानसेन इत्यादींनी संगीतातून ईश्वरप्राप्ती केली. त्यांच्या गाण्यात इतके सामर्थ्य होते की, त्याचा जो परिणाम साध्य व्हायला हवा, तो होत असे; उदा. ‘दीप राग’ गायला लागल्यावर दिवे लागत. पूर्वी हे सर्व कला म्हणून केले जात होते. आजकाल गाण्यात मधुरता राहिलेली नाही. कर्कशता आहे. त्यामुळे अशी गाणी लक्षातही रहात नाहीत. हल्ली गाणे म्हणजे धांगडधिंगा असतो. त्यात देव कोठेच दिसत नाही. गाणे नावालाच राहिलेले आहे.’

– पू. नंदकुमार जाधव

११. पू. जाधवकाका यांचे गाणे गाण्यातील आध्यात्मिक उपयुक्तता

११ अ. मंत्रमुग्धतेचे उदाहरण असती पू. काका ! – प.पू. डॉ. आठवले (सनातनचे प्रेरणास्थान)
१. ‘पू. जाधवकाकांची वैशिष्ट्ये

अ. त्यांना खालच्या ते वरच्या पट्टीत सहज गाता येते.
आ. ते कोणाकडे पाहून नाही, तर अर्थाशी एकरूप होऊन गातात.
इ. ते गात असतांना त्यांचा चेहरा प्रथम निर्विचार दिसतो. नंतर गाण्याप्रमाणे त्यांचा भाव किंवा क्षात्रभाव जागृत
होतो. एकदा एका गाण्याच्या वेळी त्यांचाही भाव इतका जागृत झाला की, ते एखादा मिनिट गाणे गाऊ शकले
नाहीत. नंतर सावरून गाणे लगेचच पुढे म्हणू लागले; मात्र ऐकणार्‍यात पहिल्यापासूनच भाव जागृत झाला
होता.’

२. साधकांना येणार्‍या विविध अनुभूती

याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.

२ अ. गाणी

१. ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ ।
२. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ।
३. ‘सनातन धर्मसूर्य उगवला क्षात्रवीर हो उठा चला’ ।

२ अ १. ऐकणार्‍यांना येणारी अनुभूती : तारक शक्ती, क्षात्रतेज जागृत होणे

२ आ. ‘आनंदकंददाता नांदे या हृदयी माझ्या’ । (प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन)

२ आ १. ऐकणार्‍याला येणारी अनुभूती : भाव जागृत होणे
गाणी ऐकल्यावर एक चूक लक्षात आली. ती म्हणजे पू. जाधवकाकांसारखे गायक आपल्याकडे असतांना
त्यांना हिंदु धर्मजागृती सभांत गीते गाण्यास सांगितले नाही. त्यांच्या वाणीतील चैतन्यामुळे सभेचा उद्देश अधिक
प्रमाणात साध्य व्हायला साहाय्य झाले असते. सभेतील भाषणांपेक्षा त्यांच्या गीतांमुळे अधिक धर्मजागृती झाली
असती.

– (प.पू.) डॉ. आठवले (१३.३.२०१४)

११ आ. आवाजाची नैसर्गिक देणगी असलेले पू. जाधवकाका !

‘पू. जाधवकाका यांच्या आवाजात पहाडीपण आणि आर्तता आहे. गाण्याचा सराव जितका असेल, तितका आवाज कसला जातो; पण काकांच्या बाबतीत तसे नाही. त्यांना आवाजाची नैसर्गिक देणगीच आहे. त्यांच्या आवाजाला फिरती आहे. हवा तशा प्रकारे वळू शकणार्‍या आवाजाला ‘फिरती’ म्हणतात.’ – सौ. अंजली गाडगीळ

११ इ. भाव जागृत होणे

११ इ १. गाणे ऐकणार्‍यांमध्ये भाव जागृत करण्याची क्षमता असणे : ‘काकांच्या आवाजात दुसर्‍यामध्ये भाव जागृत करण्याची क्षमता आहे. राष्ट्रभक्तीपर गीत गातांना ‘आता आपण कृती करण्यास उद्युक्त व्हायलाच हवे’, ही तळमळ होती.’

– सौ. अंजली गाडगीळ

११ इ २. गाणे ऐकतांना राष्ट्रभक्ती निर्माण होत असल्याचे जाणवणे आणि सात्त्विक भाव जागृत होणे : ‘बाबांचे गाणे ऐकतांना ‘राष्ट्रभक्ती निर्माण होत आहे’, असे वाटत होते. मन एकाग्र होत होते. ‘मी कोठे आहे’, याचे भान रहात नव्हते. माझ्या अंगावर रोमांच येत होते.’ – कु. गायत्री जाधव (पू. जाधवकाकांची ज्येष्ठ कन्या)

११ इ ३. गाण्यातून आर्तता आणि देवाप्रतीचा उत्कट भाव जाणवणे : ‘काका ज्या आर्ततेने गाणे गातात, ते विशेष आहे. काही वेळा परिस्थिती समोर आली की, आर्तता येते. आता तशी परिस्थितीही नाही, तरी काकांच्या शब्दाशब्दातून देवाप्रतीचा उत्कट भाव जाणवत होता. ‘गाणे गातांना आपण देवाच्या दारात ‘याचक’ किंवा ‘भिकारी’ म्हणून उभे आहोत’, हा काकांचा भाव आतून जाणवतो. त्यांचे गाणे ऐकल्यावर माणूस रडल्याशिवाय रहाणारच नाही, इतका त्यांच्या वाणीला अधिकार प्राप्त झाला आहे.’ – सौ. अंजली गाडगीळ

११ ई. ‘संगीत’ या कलेत साधकत्व आणि वाणीत चैतन्य नसेल, तर त्याची परिणामकारकता शून्य ठरते. – सौ. अंजली गाडगीळ

संतांनी म्हटलेली गाणी ऐकतांना पुष्कळ वेगळ्या जगात जाता आले. वेगळ्या अनुभूती आल्या. ‘नाद’ ही मोठी शक्ती आहे’, हे अनुभवले.’ – सौ. अंजली गाडगीळ

११ उ. ‘गाणे ऐकतांना माझ्यावर उपाय होत होते.’ – कु. गायत्री जाधव (पू. जाधवकाकांची ज्येष्ठ कन्या)
११ ऊ. ‘काकांकडे वक्तृत्त्व आहे, नेतृत्व आहे, गाण्याचे अंग आहे. महत्त्वाचे म्हणजे ते संत आहेत.’
– सौ. अंजली गाडगीळ

हा लेख वाचून वाचक त्यांच्याजवळ असलेली कला ईश्वरचरणी अर्पण करून साधना करण्यास उद्युक्त होवोत, अशी श्रीगुरुचरणी प्रार्थना.

काळानुसार योग्य साधना कोणती हे जाणून घेण्यासाठी ‘क्लिक’ करा : गुरुकृपायोग

Leave a Comment