यंत्राद्वारे संशोधन करण्यापेक्षा अतींद्रिय ज्ञानाने संशोधन करणे महत्त्वाचे !

१. यंत्राद्वारे संशोधन करण्याची मर्यादा !

यंत्राद्वारे संशोधन करतांना केवळ स्थुलातील थोडीफार वस्तूस्थिती कळते; पण

अ. थोडीफार वस्तूस्थिती कळली, तरी तिचा कार्यकारणभाव कळत नाही.

आ. थोडाफार कार्यकारणभाव कळला, तरी निश्‍चित उपाय सांगता येत नाही.

इ. भाव, आनंद, शांती इत्यादी यंत्राला कळत नाहीत.

२. सूक्ष्म, म्हणजे अतींद्रिय ज्ञानाने संशोधन करणे

सूक्ष्म जगतातील वस्तूस्थिती कळल्यामुळे खरा कार्यकारणभाव कळतो आणि खरे उपायही सांगता येतात, तसेच भाव, आनंद, शांती हेही कळतात.

३. निष्कर्ष

अ. यंत्राद्वारे शिकणे हे सूक्ष्म जगतातील अक्षरे शिकण्याप्रमाणे आहे, तर सूक्ष्म, म्हणजे अतींद्रिय ज्ञानाने संशोधन करणे, हे सत्याच्या जवळ जाणारे आहे.

आ. ज्या ईश्‍वराने मानवाला निर्माण केले, तो मानव ईश्‍वरापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही, तसेच ज्या मानवाने यंत्राला निर्माण केले, ते मानवापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही.

इ. ईश्‍वराकडून उत्तर मिळवायची युक्ती कळली की, यंत्र लागत नाही. तेव्हा कळते की, विश्‍वात फक्त देव आणि असुर, तसेच चांगले आणि वाईट, हे दोनच गट प्रमुख आहेत.

ई. यंत्राद्वारे कितीही संशोधन केले, तरी त्यामुळे ईश्‍वरप्राप्ती होत नाही; पण अतींद्रिय ज्ञानाने संशोधन करतांना ते साधनेमुळेच शक्य होत असल्यामुळे ईश्‍वरप्राप्तीची तळमळ निर्माण होते आणि वाढत जाते. त्यामुळे मानव-जीवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक होते.

– (प.पू.) डॉ. आठवले (११.४.२०१४)

Leave a Comment