सकाळच्या वेळी स्नान का करावे आणि स्नानाची पूर्वसिद्धता

अनुक्रमणिका

१. सकाळच्या वेळी स्नान का करावे ?
१ अ. दुपारी स्नान करण्यापेक्षा सकाळच्या वेळी स्नान करण्याचे महत्त्व
१ आ. रात्री स्नान का करू नये ? त्याऐवजी सकाळी स्नान का करावे ?
२. स्नानाची पूर्वसिद्धता
२ अ. स्वतःची सिद्धता
२ अ १. पाटावर बसून अंगाला तेल लावावे आणि मग स्नान करावे.
२ अ २. अंगाला सुगंधी तेल किंवा उटणे लावावे आणि मग स्नान करावे.

२ आ. स्नानासाठीचे पाणी
२ आ १. स्नानासाठी तांब्याच्या हंड्यात साठवलेले पाणी चुलीवर तापवावे आणि घंगाळ्यात काढावे.
२ आ २. स्नानाच्या पाण्यात चमचाभर जाड मीठ (खडे मीठ) का घालावे ?
२ आ ३. उष्णोदक (गरम पाण्याने) स्नानासाठी निषिद्ध असलेल्या घटना, वार आणि तिथी


 

हिंदु धर्मानुसार सकाळी स्नान केल्याने काय लाभ होतात, याविषयी प्रस्तूत लेखात जाणून घेऊया. स्नानाच्या पूर्वसिद्धतेच्या अनुषंगाने स्वत:ची सिद्धता कशी करावी तसेच स्नानासाठीचे पाणी कसे असावे, याविषयीसुद्धा जाणून घेऊया.

 

 

 

१. सकाळच्या वेळी स्नान का करावे ?

ब्राह्ममुहुर्ताच्या वेळी किंवा पहाटे स्नान करण्याची आदर्श वेळ आहे. आता त्या वेळी स्नान करणे बहुतेकांना शक्य नसते. असे स्नान करणे शक्य नसल्यास सूर्योदय झाल्यावर जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर स्नान करावे. सध्या बहुतेकांच्या घरी केर काढल्यावर आणि लादी पुसल्यावर स्नानाला जाण्याचा प्रघात पडलेला असल्याने सोयीच्या दृष्टीने या ग्रंथातही (या लेखमालिकेतही) केर काढणे आणि लादी पुसणे या कृतींनंतर ‘स्नान करणे’, हे सूत्र दिले आहे.

 

१ अ. दुपारी स्नान करण्यापेक्षा सकाळच्या वेळी स्नान करण्याचे महत्त्व

१ अ १. शास्त्र – देहाला स्पर्शिणार्‍या आपतत्त्वाच्या लहरींच्या साहाय्याने देहाकडून बाह्य-वायूमंडलातील सात्त्विक लहरी ग्रहण केल्या जाणे

‘सकाळच्याच वेळी स्नान करणे अतिशय महत्त्वाचे आहे; कारण या काळात वायूमंडल सात्त्विक लहरींनी भारित असते. पाण्याच्या माध्यमातून देहाला स्पर्शिणार्‍या आपतत्त्वाच्या लहरींच्या साहाय्याने देह बाह्य-वायूमंडलातील लहरी ग्रहण करण्यात अती संवेदनशील बनल्याने आपोआपच त्याच्याकडून बाह्य-वायूमंडलातील सात्त्विक लहरी ग्रहण केल्या जातात; परंतु आता कलियुगात सर्व उलटेच चालले आहे. स्त्रिया प्रथम घरातील कामे करून त्यानंतर घाम येतो; म्हणून नंतर स्नान करून मग वेणी घालतात. दुपारच्या वेळी वायूमंडलात रज-तमात्मक लहरींचे संचारण वाढल्याने आणि स्नानाच्या वेळी देह बाह्य-वायूमंडलातील लहरी ग्रहण करण्यात संवेदनशील बनल्याने तो उलट रज-तमात्मक लहरीच ग्रहण करतो आणि अशा प्रकारे देहाची बाह्यशुद्धी साधली गेली, तरी अंतःशुद्धी होत नाही.’

 

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ९.१०.२००७, सकाळी ९.४६)

 

१ आ. रात्री स्नान का करू नये ? त्याऐवजी सकाळी स्नान का करावे ?

१ आ १. शास्त्र – सकाळी स्नान केल्यावर स्थूल आणि सूक्ष्म या देहांची सात्त्विकता जास्त प्रमाणात वाढून ती दीर्घकाळ टिकणे आणि रात्री ती अल्पकाळ टिकणे

‘सकाळची वेळ सात्त्विक असल्यामुळे सकाळी स्नान केल्यावर स्थूल आणि सूक्ष्म या देहांची सात्त्विकता जास्त प्रमाणात वाढते आणि ती दीर्घकाळ टिकून रहाते. रात्रीची वेळ तमोगुणी असल्यामुळे त्या वेळी स्नान केल्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म या देहांची सात्त्विकता विशेष वाढत नाही आणि वाढल्यास ती अल्पकाळ टिकते. त्यामुळे त्या व्यक्तीला स्नानाचा लाभ फार अल्प प्रमाणात होतो.’ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री ११.१३)

 

 

२. स्नानाची पूर्वसिद्धता

२ अ. स्वतःची सिद्धता

२ अ १. पाटावर बसून अंगाला तेल लावावे आणि मग स्नान करावे.

 

२ अ १ अ. शास्त्र – पाटात प्रदिप्त अवस्थेत असणार्‍या सूक्ष्म-अग्नीमुळे त्या अग्नीरूपी तेजाचे देहाभोवती सूक्ष्म-वायूमंडल निर्माण होण्यास साहाय्य होणे आणि तेल लावल्याने देहातील पेशींतील चेतना कार्यरत होणे

‘स्नानाला जाण्यापूर्वी पाटावर बसून अंगाला तेल लावून मगच जावे. पाटात प्रदिप्त अवस्थेत सूक्ष्म-अग्नी असल्याने या अग्नीरूपी तेजाचे देहाभोवती सूक्ष्म-वायूमंडल निर्माण होण्यास साहाय्य होते. पाटाच्या खाली निर्माण झालेली निर्गुण पोकळी देहाचे पाताळातून ऊत्सर्जित होणार्‍या त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण करते. तेल लावल्याने देहातील पेशींतील चेतना कार्यरत होते. त्यामुळे देहातील पेशी स्नानातून मिळणार्‍या चैतन्यमय लहरी ग्रहण करण्यास योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सिद्ध होतात.’

 

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

२ अ २. अंगाला सुगंधी तेल किंवा उटणे लावावे आणि मग स्नान करावे.

२ अ २ अ. शास्त्र – सुगंधी तेल किंवा उटणे या वस्तू सात्त्विक असल्याने स्थूल आणि सूक्ष्म देहांभोवती आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होऊन शरीर शुद्ध आणि सात्त्विक बनण्यास साहाय्य होणे

‘बहुधा सुगंधी तेल किंवा उटणे या वस्तू सात्त्विक असतात आणि नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेल्या असतात. त्यांचा सुगंधही सात्त्विक असतो. त्यांच्यामध्ये वायूमंडलातील सात्त्विक आणि देवतांच्या लहरी ग्रहण करण्याची क्षमता असते. सुगंधी तेल किंवा उटणे लावून स्नान केल्यामुळे शरिरातील रज-तम लहरी घटतात, तसेच स्थूल आणि सूक्ष्म देहांभोवती आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होऊन शरीर शुद्ध आणि सात्त्विक बनण्यास साहाय्य होते.

२ अ २ अ १. साबणाने स्नान केल्याचे सूक्ष्मातील दुष्परिणाम

रसायने आणि कृत्रिम पदार्थ यांपासून बनवलेल्या साबणाचा सुगंधही कृत्रिम असतो. असा साबण रज-तमयुक्त असतो. अशा साबणाचा वापर केल्यामुळे स्थुलातून देह स्वच्छ होतो; परंतु सूक्ष्मातून स्थूल आणि सूक्ष्म या देहांभोवती रज-तमयुक्त आवरण निर्माण होते.’

 

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १५.११.२००७, रात्री ८.२५)

२ अ २ आ. उटणे लावून स्नान केल्याने कफ आणि मेद झडणे

उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम् ।
स्थिरीकरणमङ्गानां त्वक्प्रसादकरं परम् ।। – अष्टाङ्गहृदय, सूत्रस्थान, अध्याय २, श्लोक १४

अर्थ : अंगास उटणे लावल्याने कफ आणि मेद झडतात, शरीर सुदृढ होते आणि त्वचा स्वच्छ होते.

२ अ २ इ. `सनातन उटणे’ वापरल्याने आलेल्या अनुभूती
१. ‘सनातन उटणे’ लावल्यावर त्वचारोग पूर्णपणे बरा होणे

‘माझा मुलगा कु. प्रथमेश (वय ८ वर्षे) याला त्वचेचा रोग झाला होता. त्वचेच्या वैद्यांचे उपचार घेऊनही काहीही सुधारणा होत नव्हती. आधुनिक वैद्यांनी (अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांनी) दिलेले लेपन (मलम) लावल्यावर तात्पुरते बरे व्हायचे; परंतु पुन्हा दुसर्‍या ठिकाणी तसेच व्हायचे. ७-८ मासांनंतर ‘सनातन उटणे’ लावल्यावर हा रोग पूर्णपणे बरा झाला.’ – सौ. अर्चना भोईर, पेण, रायगड.

२. उटणे लावण्याविषयी निरुत्साही असणे आणि उटणे लावल्यानंतर शरिरात दीप प्रज्वलित झाल्यासारखे वाटून हिंदूंच्या धार्मिक विधींमधील अपूर्व शक्तीची प्रकर्षाने जाणीव होणे

‘८.११.२००७ या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे आश्रमात होणार्‍या सुगंधी उटणे लावून घेण्याच्या सामूहिक विधीत सहभागी होण्यासाठी मला जरासुद्धा उत्साह वाटत नव्हता; कारण मला त्याविषयी काहीच ज्ञान नव्हते. केवळ ‘त्या दिवशी आयुर्वेदिक चूर्ण (पावडर) लावून स्नान करतात’, इतकेच ज्ञात होते. त्या वेळी ‘आश्रमात अंथरुणात झोपलेली मी एकटीच साधिका असेन’, असे वाटून मी उटणे लावण्याच्या कार्यक्रमस्थळी इतर साधिकांसमवेत उपस्थित राहिले. सनातन-निर्मित उटणे लावून झाल्यानंतर मी कोणी नवीनच व्यक्ती झाल्याची मला जाणीव झाली आणि माझ्या आत दीप प्रज्वलित झाल्यासारखे वाटले. या अविस्मरणीय अनुभूतीमुळे मला तेथून हलावेसे वाटेना. त्या वेळी प्रथमच मला हिंदूंना लाभदायक ठरणार्‍या धार्मिक विधींमधील अपूर्व शक्तीची इतक्या प्रकर्षाने जाणीव झाली.’ – सौ. शॅरन सिक्वेरा, गोवा.

टीप – उटणे लावून स्नान करणे शक्य नसेल, तर आयुर्वेदिक पदार्थांपासून बनवलेला फेनक (साबण) वापरू शकतो. सनातनचा असा सात्त्विक फेनकही उपलब्ध आहे.

 

२ आ. स्नानासाठीचे पाणी

२ आ १. स्नानासाठी तांब्याच्या हंड्यात साठवलेले पाणी चुलीवर तापवावे आणि घंगाळ्यात काढावे.
२ आ १ अ. शास्त्र – घंगाळ्याच्या विशिष्ट आकारामुळे त्यातील ऊन (गरम) पाण्यातून निर्माण होणार्‍या सूक्ष्म-वायूतत्त्वात्मक उष्ण ऊर्जेमुळे घंगाळ्यातील पाण्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होणे

‘स्नान करतांना तांब्याच्या हंड्यात साठवलेले शुद्ध आणि सात्त्विक पाणी चुलीवर तापवून घंगाळ्यात काढले जाते. घंगाळ्याचा आकार वरच्या दिशेने पसरट आणि खालच्या दिशेने निमुळता असल्याने वरच्या भागात ऊन पाण्यातील सूक्ष्म-वायूतत्त्वात्मक उष्ण ऊर्जा संथपद्धतीने कार्यरत स्थितीत रहाण्यास साहाय्य होते, तर तीच उष्ण ऊर्जा घंगाळ्याच्या खालच्या निमुळत्या आकारात घनीभूत झाल्याने ती पाताळाशी संलग्न जडत्वधारक त्रासदायक ऊर्जेशी लढू शकते. त्यामुळे घंगाळ्यातील पाण्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.’

 

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

२ आ २. स्नानाच्या पाण्यात चमचाभर जाड मीठ (खडे मीठ) का घालावे ?

 

२ आ २ अ. शास्त्र – मिठाच्या पाण्याने स्नान करण्याने शरिरात असलेल्या त्रासदायक शक्तीचे साठे जास्त प्रमाणात नष्ट होणे

‘मिठाच्या पाण्याने स्नान केल्यामुळे संपूर्ण शरिरात असलेल्या १०६ देहशुद्धक चक्रांवर असलेले त्रासदायक शक्तीचे साठे नष्ट होऊन देहशुद्धक चक्रे काही प्रमाणात जागृत होऊन त्रासदायक शक्ती शरिराच्या बाहेर पडते. तसेच मिठाच्या पाण्याला आपतत्त्वाचे १०० टक्के साहाय्य मिळाल्यामुळे शरिरात असलेल्या त्रासदायक शक्तीचे साठे जास्त प्रमाणात नष्ट होतात.’

– श्री गुरुतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १६.४.२००६, रात्री ९.३३)

२ आ २ आ. अनुभूती
मानेवर आलेल्या पुरळावर खाज सुटत असतांना ती औषधी उपायांनी बरी न होणे आणि मिठाच्या पाण्याने स्नान केल्यावर बरी होणे

‘माझ्या मानेवर पुरळ येऊन पुष्कळ खाज येत असे. औषधोपचार करूनसुद्धा खाज उणावली नाही. त्यानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेली ‘वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांनी मिठाच्या पाण्याने स्नान करावे’, ही सूचना वाचली. त्यानंतर पाच-सहा दिवस हा प्रयोग केल्यावर माझ्या मानेवर खाज सुटणे न्यून झाले.’ – श्रीमती नीलिमा अनंत बाणे, राजापूर, जिल्हा रत्नागिरी.

२ आ ३. उष्णोदक (गरम पाण्याने) स्नानासाठी निषिद्ध असलेल्या घटना, वार आणि तिथी

अ. जन्म अथवा मरण या निमित्ताने करावयाचे स्नान; संक्रांतीदिन स्नान आणि श्राद्धदिन स्नान

आ. आरोग्येच्छू, पुत्रेच्छू आणि मित्रेच्छू व्यक्तीने रविवार, सप्तमी आणि ग्रहण या काली उष्णोदकाने स्नान करू नये.

इ. पौर्णिमेला वा अमावास्येला उष्णोदकाने स्नान केल्यास गोवधाचे पातक लागते.

स्नानापूर्वी करावयाची प्रार्थना, त्यावेळी म्हणावयाचे श्लोक आणि स्नानाची प्रत्यक्ष पद्धत जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

 

प्रतिलोम गतीनेे अभ्यंग (मालीश) करणे

वैद्य सत्यव्रत नानल

१. प्रतिलोम गतीनेे अभ्यंग करणे म्हणजे काय ?

प्रतिलोम गतीनेे अभ्यंग करणे, म्हणजे हृदयाच्या दिशेने किंवा गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने शरिरात तेल जिरवणे.

२. प्रतिलोम गतीने अभ्यंग केल्याने होणारे लाभ

२ अ. तेल अधिक प्रमाणात शरिरात जिरणे

प्रतिलोम गतीने अभ्यंग केल्यामुळे घर्षण अधिक प्रमाणात होते. त्यामुळे त्वचेवर असलेली छिद्रे उघडतात आणि उष्णता निर्माण होऊन तेल अधिक प्रमाणात शरिरात जिरण्यास साहाय्य होते.

२ आ. त्वचेवरील लोम (लव) गळून पडण्यास साहाय्य होणे

त्वचा हे वाताचे स्थान आहे. वाताच्या वृद्धीमुळे तेथे सकस धातूची निर्मिती होण्याऐवजी मळाची उत्पत्ती अधिक प्रमाणात होत असल्यास अभ्यंग केल्यामुळे त्याची आपोआप चिकित्सा (उपाय) केली जाते. त्वचेवरील लोम हे अनुलोम दिशेत असतात. प्रतिलोम गतीने केलेल्या अभ्यंगामुळे त्वचेवरील लोम (लव) गळून पडण्यास साहाय्य होते.

२ इ. भ्राजक पित्ताचे कार्य सुधारणे

आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ हे ३ दोष सांगितले आहेत. यांचे प्रत्येकी ५ उपप्रकार आहेत. भ्राजक पित्त हा पित्ताचा एक उपप्रकार आहे. त्वचा हे त्याचे स्थान आहे. त्वचेवर लावलेल्या तेलाच्या पचनाचे कार्य भ्राजक पित्त करते. अभ्यंगासाठी वापरण्यात येणारी तेले प्रामुख्याने गुरुपाकी म्हणजे पचायला जड असतात. प्रतिलोम गतीने केलेल्या अभ्यंगाने निर्माण झालेल्या उष्णतेमुळे भ्राजक पित्ताला चालना मिळून त्याचे कार्य सुधारते. त्वचा हा मांस धातूचा उपधातू मानला आहे. भ्राजक पित्ताचे कार्य सुधारल्यामुळे आपोआपच मांसधात्वाग्नीचे (मांस धातूमधील अग्नीचे) वर्धन होते.

२ ई. उदान वायूच्या गतीला चालना मिळून शरिराला बल प्राप्त होणे

उदान वायू हा वाताचा एक उपप्रकार आहे. त्याचीही गती प्रतिलोम (खालून वर) आहे. उदान वायू शरिराला बल आणि ऊर्जा देण्याचे कार्य करतो. उदानाची गती प्रतिलोम असल्यामुळे प्रतिलोम गतीने केलेल्या अभ्यंगामुळे उदानाच्या गतीला चालना मिळून शरिराला बल आणि ऊर्जा प्राप्त होते.

२ उ. शरिराकडून हृदयाकडे होणार्‍या रक्ताच्या वहनाला बळ मिळणे

रक्ताभिसरण प्रक्रियेत हृदयाकडून रक्त शरिराकडे फेकले जाते; परंतु शरिराकडून हृदयाकडे होणारे रक्ताचे वहन हे मंद गतीने होत असते. मागून येणार्‍या रक्ताच्या गतीमुळे पुढचे रक्त ढकलले जाते. प्रतिलोम गतीने अभ्यंग केल्यामुळे शरिराकडून हृदयाकडे होणार्‍या रक्ताच्या वहनाला बळ मिळते.

– वैद्य सत्यव्रत नानल, मुंबई

Leave a Comment